‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्रीच्या मॅटर्निटी फोटोशूटवर भडकले नेटकरी; म्हणाले ‘थोडी तरी लाज..’

विदिशाने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. मात्र 'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय मालिकेत अनिता मिश्राची भूमिका साकारून तिला अधिक लोकप्रियता मिळाली. तिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली.

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्रीच्या मॅटर्निटी फोटोशूटवर भडकले नेटकरी; म्हणाले 'थोडी तरी लाज..'
Vidisha SrivastavaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 2:26 PM

मुंबई : ‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत अनिता भाभाची भूमिका साकारलेली अभिनेत्री विदिशा श्रीवास्तव लवकरच आई होणार आहे. विदिशाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही ‘गुड न्यूज’ दिली आहे. नुकताच तिने मॅटर्निटी फोटोशूट केला असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये विदिशा तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. मात्र याच फोटोंमुळे तिच्यावर टीकासुद्धा होत आहे. प्रेग्नंन्सीदरम्यान केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे तिला जोरदार ट्रोल केलं जातंय.

विदिशाने पती सयाक पॉलसोबत हे खास फोटोशूट केलं आहे. त्यावर एकाने लिहिलं, ‘मला अशा पद्धतीच्या फोटोशूट्सची चिड येते.’ तर ‘आपल्या समाजाचं भविष्य नर्कात गेलंय’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने टीका केली आहे. ‘काही गोष्टी खासगीच ठेवणं योग्य असतं’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. हे फोटोशूट करताना विदिशाने अंगप्रदर्शन केल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

विदिशाने डिसेंबर 2018 मध्ये बॉयफ्रेंड सयाक पॉलशी लग्न केलं. वाराणसीमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या चार वर्षांनंतर विदिशा आई होणार आहे. मॅटर्निटी फोटोशूटविषयी विदिशा एका मुलाखतीत म्हणाली, “मी प्रेग्नंसी काळात कशी दिसत होती याची आठवण करून देणारं फोटोशूट मला करायचं होतं. माझ्यासाठी काम हे एखाद्या थेरेपीसारखं आहे. त्यामुळे संपूर्ण गरोदरपणात मी काम केलं आहे. डिलिव्हरीनंतरही मी फक्त महिन्याभराचा ब्रेक घेईन आणि पुन्हा कामाला सुरुवात करेन.”

पहा फोटो

विदिशाने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय मालिकेत अनिता मिश्राची भूमिका साकारून तिला अधिक लोकप्रियता मिळाली. तिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. वयाच्या 15 व्या वर्षी तिने पहिल्या चित्रपटात काम केलं.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.