Bholaa | अजय देवगणच्या ‘भोला’ची दमदार ओपनिंग; पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये

मुंबई : अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्यानंतर रामनवमीच्या मुहूर्तावर त्याचा ‘भोला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजयनेच केलं असून त्यानेच मुख्य भूमिका साकारली आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. भोलाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण […]

Bholaa | अजय देवगणच्या 'भोला'ची दमदार ओपनिंग; पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये
Bholaa MovieImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 8:27 AM

मुंबई : अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्यानंतर रामनवमीच्या मुहूर्तावर त्याचा ‘भोला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजयनेच केलं असून त्यानेच मुख्य भूमिका साकारली आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. भोलाच्या टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. त्याचप्रमाणे प्रदर्शनाच्या दिवशी सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पहायला मिळाल्या होत्या. आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. अजय देवगणच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

पहिल्या दिवसाची कमाई

भोला या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा अजय देवगण आणि तब्बू यांची जोडी पहायला मिळाली. ‘दृश्यम 2’मध्येही या दोघांनी एकत्र काम केलं होतं. आता तब्बू पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत परतली आहे. सुरुवातीच्या आकड्यांनुसार ‘भोला’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं जातंय. या चित्रपटाने गुरुवारी जवळपास 11.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘भोला’ची ही कमाई ‘दृश्यम 2’च्या तुलनेत कमी आहे. दृश्यम 2 ने पहिल्या दिवशी जवळपास 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र वीकेंडदरम्यान भोलाच्या कमाईत चांगली वाढ होऊ शकते असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला आहे. भोलाचा बजेट 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जातंय.

हे सुद्धा वाचा

‘भोला’ हा तमिळ चित्रपट कैथीचा रिमेक आहे. त्यामुळे कैथीशी चित्रपटाची कथा फार मिळतीजुळती आहे. मात्र संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार करत निर्मात्यांनी या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावत बरेच बदल केले आहेत. अजय देवगणने चित्रपटातील ॲक्शन सीन्सला नव्या अंदाजात सादर केले आहेत. या चित्रपटात अजय देवगणसोबतच तब्बू, आमला पॉल, दीपक डोब्रियाल, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा पोलीस अधिकारी डायना जोसेफ (तब्बू) आणि कैदी भोला (अजय देवगण) यांच्या अवतीभोवती फिरते.

भोला या चित्रपटाच्या माध्यमातून आमला पॉल ही पहिल्यांदाच बाॅलिवूडमध्ये काम करतेय. आमला ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आमलाचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. तर दिग्दर्शक म्हणून अजयचा हा चौथा चित्रपट आहे. याआधी त्याने यू मी और हम, शिवाय आणि रनवे 34 या तीन चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.