Bhumi Pednekar | सिद्धार्थ-कियाराच्या पार्टीत भूमी पेडणेकरने मिस्ट्री मॅनला केलं किस; व्हिडीओ व्हायरल

भूमी पेडणेकरने अत्यंत ग्लॅमरस अंदाजात या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. मात्र या पार्टीनंतरचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भूमी एका मिस्ट्री मॅनला किस करताना दिसतेय.

Bhumi Pednekar | सिद्धार्थ-कियाराच्या पार्टीत भूमी पेडणेकरने मिस्ट्री मॅनला केलं किस; व्हिडीओ व्हायरल
Bhumi PednekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 1:13 PM

मुंबई: जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीने मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं. या रिसेप्शनला बॉलिवूडमधील बरेच कलाकार उपस्थित होते. करीना कपूर, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, दिशा पटानी, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, भूमी पेडणेकर या सेलिब्रिटींच्या लूकने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं. भूमी पेडणेकरने अत्यंत ग्लॅमरस अंदाजात या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. मात्र या पार्टीनंतरचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भूमी एका मिस्ट्री मॅनला किस करताना दिसतेय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भूमी पार्टीनंतर तिच्या कारच्या दिशेने जाते. यावेळी तिच्या मागे एक व्यक्ती उभी असते. यावेळी पापाराझी दोघांचा व्हिडीओ शूट करत असतात. भूमी कारमध्ये बसल्यानंतर ती व्यक्ती पापाराझींसमोर भूमीला किस करते. त्याचवेळी भूमीचा बॉडीगार्ड कॅमेरा झाकण्याचा प्रयत्न करतो.

हे सुद्धा वाचा

भूमीला किस करणारा हा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण अशी चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये काहींनी भूमीची खिल्लीसुद्धा उडवली आहे. सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन पार्टीमध्ये भूमीने सोनेरी रंगाची शिमर साडी नेसली होती. त्यावर रिव्हिलिंग ब्लाऊज परिधान केला होता. ‘ते किसिंग नव्हतं तर भूमीला त्याने CPR दिला. कारण बराच वेळ तिने तिचा श्वास रोखून धरला होता’, असं एका युजरने लिहिलं.

View this post on Instagram

A post shared by Bhumi ? (@bhumipednekar)

या व्हिडीओमधील मिस्ट्री मॅन हा बिझनेसमन यश कटारिया असू शकतो, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे. यश आणि भूमी गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

भूमीने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपली वेगळी ओळख बनवली. सात वर्षांच्या करिअरमध्ये तिने चौकटीबाहेरच्या भूमिका साकारल्या आहेत. भूमी तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.

भूमीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ती नुकतीच ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने विकी कौशल आणि कियारा अडवाणीसोबत काम केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

भूमीने आजवर ‘दम लगा के हैशा’, ‘बधाई दो’, ‘पती पत्नी और वो’, ‘रक्षाबंधन’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बाला’, ‘सांड की आँख’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.