Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराचे दोन भागात विभाजन, घरात पुन्हा एकदा हंगामा

बिग बॉस 14 (Bigg Boss 14)च्या एपिसोडमध्ये मोठ्या हंगामा बघायला मिळाला. रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी जोपर्यंत कविता कौशिक घराची कर्णधार आहे तोपर्यंत, नाश्ता बनवण्याचे काम करणार नाही, असे सांगितले.

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घराचे दोन भागात विभाजन, घरात पुन्हा एकदा हंगामा
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 2:32 PM

मुंबई : बिग बॉस 14 (Bigg Boss 14)च्या एपिसोडमध्ये मोठ्या हंगामा बघायला मिळाला. रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी जोपर्यंत कविता कौशिक घराची कर्णधार आहे तोपर्यंत, नाश्ता बनवण्याचे काम करणार नाही, असे सांगितले. त्यानंतर बिग बॉस घरात वाद निर्माण झाला. कविता रुबीनाला कमकुवत म्हणते, तर रुबीना कविताला हुकूमशहा म्हणते आणि यावरून मोठा वाद होतो. (Bigg Boss 14 division of the Bigg Boss house into two parts) कविता घराची प्रमुख कॅप्टन्सी टास्कमध्ये ‘बिग बॉस’चे घर दोन भागात विभागण्यात आले आहे. या टास्कची प्रमुख म्हणून कविताची नेमणूक करण्यात आली होती. टास्कमध्ये जास्मीन आणि रुबीना या दोघी बहिणी आहेत. तर, अली, राहुल निक्की हे जास्मीनचे कुटुंब आहे. दुसरीकडे अभिनव, एजाज आणि पवित्रा हे रूबीनाचे कुटुंब आहे. कविता कौशिक ही पंचायतची सरपंच आहे. दोन्ही बहिणींना घराच्या विभागणीसाठी सरपंचसमोर उभे राहायचे होते. दोन्ही बहिणींचे म्हणणे ऐकल्यानंतर कविता आपला निर्णय सांगितला. घराच्या विभागणी वेळी जास्मीन आणि रुबीना ऐकमेंकांवर वेगवेगळे आरोप करतात. या विभागणीमध्ये जास्मीनला किचन तर बेडरूम रूबीनाला सोपवण्यात आले आहे.

या टास्कमुळे बिग बॉसच्या घरात बर्‍याच दिवसांपासून सुरू असलेली मैत्री तुटलेली दिसली. टास्कमध्ये रुबीना आणि जास्मीन एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. किचन मिळविण्यासाठी, जास्मीन रुबीनावर अनेक आरोप करते. ती म्हणते की, ती किचनमध्ये राहून राजकारण करते आणि हे चुकीचे आहे. ती घरातील इतर सदस्यांना उपाशी ठेवते. तर बेडरूम घेण्यासाठी रुबीना जास्मीवर आरोप करते की, जास्मीन ढोंगी आहे आणि ती खोटे बोलते. मात्र, किचन जास्मीन आणि तिच्या टीमला मिळते आणि रुबीना आणि टीमला बेडरूम मिळते. कविता आणि अलीमध्ये जोरदार भांडण अली गोनी, अभिनव शुक्ला आणि रुबीना यांनी कॅप्टन कविताच्या नकळत फ्रीजमधून सॉफ्ट ड्रिंक चोरी करून बिग बॉसच्या घराच्या नियमांचे उल्लंघन केले होते. बिग बॉस कविताला म्हणाले होते की, घरातील ज्या सदस्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, असे तुम्हाला वाटते अशा सदस्याचे वैयक्तिक सामान उचलून बिग बॉसच्या स्वाधीन करावे. यावेळी कविता अलीमध्ये जोरदार भांडणे झाली होती. अभिनव आणि कविता फ्रेंड्स विथ बेनिफिट? अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘भूतं’ अवतरणार!

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरातील सहा सदस्य नॉमिनेशन प्रक्रियेत

(Bigg Boss 14 division of the Bigg Boss house into two parts)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.