Bigg Boss 14 | जास्मीन, अली, रूबीना की अभिनव? ‘बिग बॉस’मधून एक सदस्य बेघर होणार!

यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. परंतु, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली.

Bigg Boss 14 | जास्मीन, अली, रूबीना की अभिनव? ‘बिग बॉस’मधून एक सदस्य बेघर होणार!
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 4:06 PM

मुंबई : यावर्षी ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या पर्वाची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून झाली होती. मात्र, सुरूवातीचे काही आठवडे म्हणावे तेवढे खास गेले नाहीत. परंतु, हळूहळू ‘बिग बॉस 14’ने वेगाने चर्चेत येण्यास सुरुवात केली. दरम्यान, बरेच ट्विस्ट आणि मनोरंजक वळणे सध्या ‘बिग बॉस 14’मध्ये पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी काल नॅशनल टिव्हीवर धक्कादायक खुलासे केले होते. यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. (Bigg Boss 14 Jasmin, Ali, Rubina and abhinav ? A member from will be homeless)

बिग बॉसच्या घरामध्ये फिनाले वीकची पहिली एविक्शन बघायला मिळाली आहे. फिनालेमध्ये जाण्यासाठी पहिला टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये गार्डन परिसरामध्ये स्पर्धकांना जोडीने बसवण्यात आले. सर्वात अगोदर जास्मीन आणि अलीची जोडी गार्डन परिसरात टास्कसाठी बनवलेल्या जागेवर बसलेली दिसली.

या टास्कमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी घरातील सदस्य विचारतील त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. जास्मीनला निक्की विचारते की, आजकाल तु खूप नकारात्मक वाटतंय आहेस, तसेच तु कोणाबरोबरही भांडतेस, हे तु अलीच्या सांगण्यावरून करते का? अली जे म्हणतो तेच तु करते आहेस, तु स्वतःचा खेळ खेळत नाहीस आणि तुझी स्वतःचा भूमिका नाही? या प्रश्नावर जास्मीन फक्त हसताना दिसते.

जास्मीन आणि अली नंतर रुबीना आणि अभिनवची जोडी टास्कच्या जागी बसते. जास्मीन रुबीनाला म्हणते की, तु नॅशनल टीव्हीवर अभिनवचा सतत अपमान करत असतेस. मात्र, तो नेहमी शांत बसतो, तो फक्त तुझा अपमान होऊ नये, यामुळे शांत बसतो. म्हणजेच तु त्याच्यावर जेवढे प्रेम करतेस, त्यापेक्षाही जास्त तो तुझ्यावर प्रेम करतो. कविता रुबीना आणि अभिनवला म्हणते की, तुम्ही तुमचा वैयक्तिक प्रश्न गेममध्ये सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचे आहे.

या टास्कमधला सर्वात महत्वाचे म्हणजे हा टास्क जी जोडी हरणार आहे, त्यापैकी एकाला बिग बॉसचे घर सोडून जावे लागणार आहे.अलीने बिग बॉसने दिलेल्या बॉक्सला लाथ मारल्यामुळे कविताला राग आला होता. कविता बिग बॉसला म्हणते की, अशा हिंसक वातावरणात मी घरात राहू शकत नाही. त्याचवेळी रुबीना कविताला बोलण्यासाठी जाते. त्यावेळी कविता रुबिनाला सांगते की, अभिनव आणि मी फ्रेंड्स विथ बेनिफिट होतो. तुला कदाचित अभिनवने कधी सांगितले नसेल. त्यावेळी रूबीना कविताला म्हणते मला माहिती आहे. मात्र, हे ऐकून घरातील इतर सदस्यांना धक्का बसला होता. रूबीना अभिनवला म्हणते की, तु मला कधी सांगितले नाही की, तु आणि कविती फ्रेंड्स विथ बेनिफिट होतात. यावरून अभिनव आणि रूबीनामध्ये वाद झाला होता.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

(Bigg Boss 14 Jasmin, Ali, Rubina and abhinav ? A member from will be homeless)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.