Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) प्रोमोमध्ये रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोघे नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार होते, असा धक्कादायक खुलासा रुबीनाने केला आहे.

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 3:00 PM

मुंबई :बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) प्रोमोमध्ये रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे दोघे नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार होते, असा धक्कादायक खुलासा रुबीनाने केला आहे. ही गोष्ट रुबीनाने नॅशनल टीव्हीवर सर्वांसमोर शेअर केली आहे. घटस्फोटाविषयी सांगताना रुबीनाला अश्रू अनावर झाले होते. जगभरातील प्रेक्षकांसमोर रुबीनाने तिचे हे दुःख व्यक्त केले आहे. (Bigg Boss 14 Rubina and Abhinav divorce in November?)

यावेळेच्या ‘वीकेंड का वार’ची सुरूवात जोरदार झाली. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये चार नव्या पाहुण्यांचे आगमन झाले होते. रौनित बिस्वास, काम्या पंजाबी, संदीप सिकंद आणि देवोलीना भट्टाचार्या घरातील या सदस्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी आले होते. यामध्ये पतीला पाहून कविता कौशिक भावनिक झाली होती.

अली गोनीच्या प्रवेशानंतर जास्मीनचा बदलला रंग बिग बॉसच्या मंचावर आलेल्या पाहुण्यापैकी निर्माता संदीप सिंकद हे कविता आणि एजाज यांच्यातील संबंधांबद्दल बोलताना दिसले. त्यांना असे वाटते की, कविता घरात टार्गेट का होते? कारण ती घरातील सर्वांनाच टार्गेट करते. पुढे ते म्हणाले की, बिग बॉसच्या घरात जी कविता आपल्याला दिसत आहे, ती कविता नसून, चंद्रमुखी चौटाला आहे. काम्या पंजाबी आणि देवोलीना जास्मीन भसीन विषयी बोलताना दिसल्या. दोघींनाही असे वाटते की, अली बिग बॉसच्या घरात आल्यानंतर जास्मीन खूप बदली आहे.

ती स्वत: काहीच करत नसून जास्मीन अलीवर अवलंबून आहे. जोपर्यंत तिला रूबीनाची गरज होती, तोपर्यंत ती रूबीनाशी चांगली वागली. त्यानंतर अली आला आणि तिने रूबीनालाच टार्गेट केले आहे. त्यामुळे बाहेरही जास्मीनची इमेज खराब होत आहे. आणि तिचा खेळही खराब झाला आहे. सलमान खान घरातील सदस्यांना एक टास्क देतो. त्यामध्ये रुबीना आणि जास्मीन यांच्यासमोर हृदयाच्या आकारचे भांडे ठेवले जाते. या दोघींपैकी ज्यांच्या मनात जास्त द्वेष आहे, त्यांच्यासमोर ठेवलेल्या हृदयात काळे पाणी टाकायचे होते. पवित्रा पुनिया, अभिनव शुक्ला आणि एजाज खान हे जास्मीनच्या हृदयात काळे पाणी टाकतात. तर राहुल वैद्य, निक्की तंबोली, अली गोनी आणि कविता हे रूबीनासमोरच्या हृदयात काळे पाणी टाकतात. सलमान खान जाहीर करतो की, या आठवड्यात विकास गुप्ता, राखी सावंत, मनु पंजाबी, राहुल पंजाबी, अर्शी खान आणि काश्मिरा शाह ‘बिग बॉस’च्या घरात सामील होणार आहेत. हे सर्व घरातील सदस्यांना आव्हान देताना दिसतील. पवित्रा पुनिया ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर घरातून बेघर होणाऱ्या नॉमिनेट सदस्यांपैकी पवित्रा पुनिया हिला सर्वांत कमी मत मिळाल्यामुळे बेघर व्हावे लागले. पवित्रांच्या निघण्यापूर्वी एजाज खान तिला प्रेमाने मिठी मारताना दिसला.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | बिग बॉस घरातील ‘व्हिलन’ ठरल्या रूबीना, निक्की आणि जास्मीन

Bigg Boss 14 |रूबीना-जास्मीनच्या मैत्रीत फूट, अभिनव आणि रूबीनामध्येही वाद बिग बॉसच्या घराचे चित्र पालटले!

(Bigg Boss 14 Rubina and Abhinav divorce in November?)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.