Bigg Boss 16: भारती सिंगच्या चिमुकल्या मुलाची ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री; सलमानने दिली ‘ही’ मौल्यवान भेट

बिग बॉसच्या मंचावर आल्यानंतर भारतीला सलमानने दिलेलं जुनं वचन आठवतं आणि ती म्हणते, "सलमान भाईची सगळी वचनं लक्षात आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या मुलाला ते लाँच करतील".

Bigg Boss 16: भारती सिंगच्या चिमुकल्या मुलाची 'बिग बॉस'च्या घरात एण्ट्री; सलमानने दिली 'ही' मौल्यवान भेट
Bigg Boss 16: भारती सिंगच्या चिमुकल्या मुलाची 'बिग बॉस'च्या घरात एण्ट्रीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 11:22 AM

मुंबई: बिग बॉसच्या 16 वा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. आठवडाभर बिग बॉसच्या घरात बंदिस्त असलेले स्पर्धक प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. तर आठवड्याअखेर वीकेंड का वार या खास एपिसोडमध्ये सलमान खानची एण्ट्री होते. बिग बॉसच्या नव्या एपिसोडमध्ये कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हजेरी लावणार आहेत. या एपिसोडमध्ये आणखी एक खास पाहुणा आला आहे. या खास पाहुण्याने प्रेक्षकांसोबतच सलमानचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. हा चिमुकला पाहुण आहे भारती आणि हर्षचा मुलगा लक्ष्य.

भारतीने तिचा मुलगा लक्ष्यला सलमान खानच्या भेटीला आणलं आहे. बिग बॉसच्या मंचावर आल्यानंतर भारतीला सलमानने दिलेलं जुनं वचन आठवतं आणि ती म्हणते, “सलमान भाईची सगळी वचनं लक्षात आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या मुलाला ते लाँच करतील”.

हे सुद्धा वाचा

यानंतर भारती तिच्या मुलाला स्टेजवर आणते आणि सलमानच्या हातात देते. लक्ष्यला उचलून थकल्याने ती लगेच त्याला सलमानकडे सोपवते आणि सलमान त्याला उचलून घेतो.

यावेळी लक्ष्यला सलमान त्याचं मौल्यवान ब्रेसलेट भेट म्हणून देतो आणि हर्षलाही लोहढीची खास भेट देतो. सलमानच्या हातात एक ब्रेसलेट नेहमीच पाहिलं जातं. ते ब्रेसलेट सलमानसाठी खूप खास असल्याचं म्हटलं जातं. यानंतर भारती मस्करीत सलमानला म्हणते, “तुझं पनवलेचं फार्महाऊस तू कधी रिकामा करणार आहेस?” हे ऐकताच सलमानसह सर्वजण हसू लागतात.

या शोमध्ये भारती एका कागदावर सलमानची सहीसुद्धा घेते. “तुझं पनवेलचं फार्महाऊस आता तू माझ्या मुलाच्या नावावर केलं आहेस” असं म्हणत ती तो कागद दाखवते. सलमान आणि भारती यांच्यातील मस्करीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.