‘पापा की परी, स्कुटी लेकर उडी’, Bigg Boss 16 फेम अभिनेत्रीच्या ड्रायव्हिंग व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स
बिग बॉस 16 मध्ये दोन वेळा एण्ट्री करणारी अभिनेत्री श्रीजिता डे हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्कुटी चालवताना दिसतेय.
!['पापा की परी, स्कुटी लेकर उडी', Bigg Boss 16 फेम अभिनेत्रीच्या ड्रायव्हिंग व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स 'पापा की परी, स्कुटी लेकर उडी', Bigg Boss 16 फेम अभिनेत्रीच्या ड्रायव्हिंग व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/02/23150110/Sreejita-De.jpg?w=1280)
मुंबई : बिग बॉसचा सोळावा सिझन नुकताच संपला. मात्र या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत आहेत. बिग बॉस 16 मधील काही स्पर्धकांना चित्रपट तर काहींनी म्युझिक व्हिडीओचे ऑफर मिळाले आहेत. तर काही जण बिग बॉसच्या घराबाहेर पडल्याच्या आनंदात पार्टी करत आहेत. अशातच बिग बॉस 16 मध्ये दोन वेळा एण्ट्री करणारी अभिनेत्री श्रीजिता डे हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्कुटी चालवताना दिसतेय.
शो संपल्यानंतर श्रीजिताला फराह खानच्या पार्टीतही पाहिलं गेलं. आता हळूहळू हे स्पर्धक त्यांच्या रोजच्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र झाले आहेत. श्रीजिता डेच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ती विचारताना दिसतेय, “यात किती पॉवर आहे?” त्यानंतर ती स्कुटी चालवण्याचा प्रयत्न करते. मात्र काही सेकंदांनंतर सर्वांचा भ्रम दूर होतो. कारण ती एका झटक्यात गती वाढवते आणि त्यानंतर ती जमिनीवर पाय ठेवून स्कुटी थांबवण्याचा प्रयत्न करते. श्रीजिताने स्कुटी थांबवली नसती तर ती समोर उभ्या असलेल्या कारला धडकलीच असती.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/02/23144140/sourav-ganguly.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/02/23133140/Ranbir-Kapoor.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/02/23130443/Swara-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/02/22184732/Anushka-Shetty.jpg)
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
श्रीजिताचे ड्रायव्हिंग स्किल्स पाहून सोशल मीडियावर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या कमेंट्समध्ये अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. ‘पापा की परी.. स्कुटी लेकर उठी’ असं एकाने लिहिलंय. तर ‘पापा की परीने पायानेच स्कुटी थांबवली’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘स्कुटीपेक्षा जास्त पॉवर श्रीजिताच्या पायात आहे’, अशाही शब्दांत नेटकऱ्यांनी मस्करी केली.
श्रीजिताला बिग बॉसच्या घरात दोन वेळा संधी देण्यात आली होती. मात्र दोन्ही वेळा ती विशेष काही कामगिरी केली नाही. बिग बॉसच्या घरातील श्रीजिताचा लिपलॉक व्हिडीओ मात्र तुफान चर्चेचा विषय ठरला होता. श्रीजिता आणि सौंदर्याने लिपलॉक करत सर्वांना मोठा धक्का दिला होता. शिव ठाकरे आणि अब्दु रोझिकने त्या दोघींना लिपलॉक करताना पाहिलं होतं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या होत्या.