Bigg Boss 16 ची ‘ही’ स्पर्धक अडकणार विवाहबंधनात ; व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वेडिंग प्लान समोर

एकाच व्यक्तीसोबत दोन वेळा लग्न करणार Bigg Boss 16 ची 'ही' स्पर्धक ; खास फोटो शेअर करत अभिनेत्रीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केला मोठा खुलासा

Bigg Boss 16 ची 'ही' स्पर्धक अडकणार विवाहबंधनात ; व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी वेडिंग प्लान समोर
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 12:57 PM

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’ शो संपला आहे. रविवारी अभिनेता आणि शोचा होस्ट सलमान खान याने ‘बिग बॉस १६’ चा म्हणून एनसी स्टॅन याच्या नावाची घोषणा केली. शो संपल्यानंतर स्पर्धक सध्या काय करत आहेत? अशी चर्चा रंगत आहे. बिग बॉसनंतर अनेकांना नवीन ऑफर मिळाली आहे, तर दुसरीकडे ‘उतरन’ मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डे (Sreejita De) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा रंगच आहे. श्रीजिता डे बॉयफ्रेंड मायकल बीपी (Michael BP) याच्यासोबत लग्न करणार आहे.

श्रीजिता डे आणि मायकल बीपी यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, २०२१ मध्ये मायकल बीपी याने एफिल टॉवर (Eiffel Tower) समोर गुडघ्यांवर बसून श्रीजिता हिला प्रपोज केलं होतं. नुकताचं अभिनेत्रीने चाहत्यांसोबत तिचा वेडिंग प्लान शेअर केला आहे. श्रीजिता लवकरच तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Sreejita De (@sreejita_de)

‘बिग बॉस १६’ची प्रसिद्ध स्पर्धक शो संपल्यानंतर आता लग्नामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सांगितलं आहे की, १ जुलै रोजी श्रीजिता डे आणि मायकल बीपी विवाहबंधनात अडकणार आहेत. श्रीजिता डे आणि मायकल बीपी यांचं दोन वेळा लग्न होणार आहे. श्रीजिता डे आणि मायकल बीपी यांचं ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीत लग्न करणार आहेत.

श्रीजिता डे हिने दिलेल्या माहितीनुसार, ‘१ जुलै रोजी ख्रिश्चन पद्धतीत लग्न होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हिंदू पद्धतीने लग्न होणार आहे. पहिलं लग्न परंपरेनुसार जर्मनी याठिकाणी होणार आहे. त्यानंतर हिंदू पद्धतीत गोवा किंवा कोलकाता येथे दुसरं लग्न होणार आहे…’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा आहे.

श्रीजिता डे आणि मायकल बीपी यांची लव्ह स्टोरी

श्रीजिता डे आणि मायकल बीपी यांची ओळख २०१९ मध्ये झाली होती. जेव्हा अभिनेत्री जर्मनी येथे फिरण्यासाठी गेली. मायकल जर्मनी याठिकाणी राहतो. पण आता तो भारतात असल्याचं सांगितलं जात आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘पहिला व्हॅलेंटाईन डे आम्ही सोबत साजरा केला होता. एकमेकांना कोणतेही गिफ्ट न देण्याचा निर्णय आम्ही तेव्हा केला होता. पण त्याला एक कॅप दिली होती. जी त्याने आजपर्यंत घातलेली नाही…’ असं अभिनेत्री श्रीजिता डे म्हणाली.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.