Bigg Boss 16 फेम सुंबुलला एकता कपूरची मोठी ऑफर; ‘या’ सुपरहिट मालिकेत साकारणार भूमिका

ग्रँड फिनालेच्या आधीच सुंबुलला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. मात्र आता बिग बॉसमुळे तिचा खूप मोठा फायदा झाला आहे. कारण निर्माती एकता कपूरच्या एका सुपरहिट मालिकेची ऑफर तिला देण्यात आली आहे.

Bigg Boss 16 फेम सुंबुलला एकता कपूरची मोठी ऑफर; 'या' सुपरहिट मालिकेत साकारणार भूमिका
Sumbul Touqeer KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 11:29 AM

मुंबई : बिग बॉसच्या सोळाव्या सिझनमध्ये जेव्हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुंबुल तौकिर खान हिने एण्ट्री केली, तेव्हा संपूर्ण सिझनमध्ये तिचाच बोलबाला पहायला मिळेल असं प्रेक्षकांना वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात उलटच झालं. सर्वाधिक मानधन घेऊन बिग बॉसमध्ये येणाऱ्या सुंबुलची जादू हळूहळू फिकी पडत गेली. शालीन भनोटच्या नादी लागल्यानंतर सुंबुल ग्रँड फिनालेपर्यंतही पोहोचणार नसल्याचा अंदाज वर्तवला गेला आणि तो खरा ठरला. ग्रँड फिनालेच्या आधीच सुंबुलला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. मात्र आता बिग बॉसमुळे तिचा खूप मोठा फायदा झाला आहे. कारण निर्माती एकता कपूरच्या एका सुपरहिट मालिकेची ऑफर तिला देण्यात आली आहे.

सुंबुल जेव्हा बिग बॉसच्या घरात पोहोचली होती , तेव्हा एकता कपूरने तिची निवड ‘नागिन 7’साठी केली होती. मात्र ती नागिनच्या मालिकेत नव्हे तर खतरों के खिलाडीच्या 13 व्या सिझनमध्ये दिसणार असल्याचं कळतंय. त्यामुळे सुंबुलच्या हातून एकताच्या मालिकेची ऑफर गेली का, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र ती एकता कपूरच्याच दुसऱ्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एकता कपूर ही सुंबुलच्या अभिनयकौशल्याने प्रभावित झाली असून तिने तिच्या हिट मालिकेची ऑफर दिली आहे. सुंबुल लवकरच ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत मोठा लीप येणार आहे. श्रद्धा आर्या आणि शक्ती अरोडा यांच्या लीपनंतर मालिकेत सुंबुलची एण्ट्री होणार आहे. मात्र याबद्दल अद्याप एकता किंवा सुंबुलने कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा

स्टार प्लस वाहिनीवरील ‘ईमली’ या मालिकेमुळे सुंबुल घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने अभिनेता गश्मीर महाजनीसोबत मुख्य भूमिका साकारली होती. तर बिग बॉसमध्ये सर्वांत कमी वयाची स्पर्धक म्हणून तिची ओळख झाली. 19 वर्षांच्या सुंबुलने तिच्या सहज स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

बिग बॉसच्या घरात सुंबुलला सर्वाधिक मानधन देण्यात आलं होतं. मात्र नंतर तिच्या कामगिरीवरून फी कमी करण्यात आली होती. 11 लाख रुपयांवरून तिची फी 8 लाख रुपयांवर झाली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.