‘स्वतःच्या पत्नीसोबत तर…’, टीना – शालिन यांच्यातील वाद टोकाला; व्हिडीओ समोर येताच सर्वत्र खळबळ
टीना दत्ता हिच्या चारित्र्यावर बोट ठेवल्यानंतर शालीन भनोटवर भडकली अभिनेत्री. वादा टोकाला पोहोचल्यानंतर टीनाने शोमधून बाहेर जाण्याची मागणी देखील केली.
Bigg Boss 16: सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १६’ शोची चर्चा सुरु आहे. शो अंतिम टप्प्यात पोहोचल्यामुळे स्पर्धक दमदार खेळी खेळत आहेत. याच कारणामुळे बिग बॉसच्या घरातील वाद चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच बिग बॉस शोचा नवीन प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये टीना – शालिन यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांमधील वाद इतक्या टोकाला गेला की, शालिन याने टीनाच्या चारित्र्यावर बोट ठेवला, तर टीना हिने थेट शालिनच्या खासगी आयुष्यातील सत्य सर्वांसमोर सांगितलं. शिवाय वादानंतर टीनाने शोमधून बाहेर जाण्याची मागणी देखील केली.
‘टिकट टू फिनाले’ आठवड्यात बिग बॉस निम्रत हिची कॅप्टन म्हणून निवड करतो. एवढंच नाही तर, इतर स्पर्धकांना निमृतचं पद काढून घ्यावं लागेल असं देखील बिग बॉसने सांगितलं. त्यानंतर कॅप्टन पदावरुन वाद सुरु असताना, टीना आणि शालिन यांच्यात जोरदार भांडण होतं.
LMAO, #Shalin bhai sahab khel gayo. Just yesterday they were literally planning to get #NimritKaurAhluwalia out of captaincy, & just 2 days ago he and PCC were discussing Nimrit is weak & will be out. Put when time came Shalin bhaiya game khel gayo. pic.twitter.com/OvwJi5tJXf
— The Bigg Boss Fan (@TheBiggBossFan) January 17, 2023
प्रोमोमध्ये शालिन म्हणतो, ‘निम्रत कॅप्टन म्हणून योग्य आहे. यावर प्रियंका आणि टीना संतापतात. वाद सुरु असताना शालिन टीनाला म्हणतो, ‘तुझ्याकडे एक मुलगा आला की, तू दुसऱ्या मुलाकडे जातेस…’ शालिनने टीनाच्या चारित्र्यावर बोट ठेवल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘स्वतःच्या पत्नीचा आदर करु शकला नाही. माझ्या चारित्र्यावर बोट ठेवतोय.’ पुढे टीनाने बिग बॉसकडे शोमधून बाहेर जाण्याची मागणी केली.
बिग बॉस शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, जेव्हा शालिनने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला, तेव्हा पासून अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’ घरातील वादग्रस्त स्पर्धकांपैकी एक म्हणजे शालिन आहे. याआधी देखील टीनाने शालिन अत्यंत रागीट असल्याचं सांगितलं होतं. आता व्हायरल होत असलेल्या नव्या प्रोमोमुळे शालिन त्याच्या स्वभावामुळे चर्चेत आला आहे.