MC Stan चं नाव ऐकून प्रियांकाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला! पहा व्हिडीओ..

अंतिम निकाल पाहून प्रेक्षकांसह बिग बॉसच्या स्पर्धकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला. कारण रॅपर एमसी स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. बिग बॉसचे माजी स्पर्धक अंकित गुप्ता आणि गौतम विज यांनी खुलेपणे नाराजीही व्यक्त केली होती.

MC Stan चं नाव ऐकून प्रियांकाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला! पहा व्हिडीओ..
Priyanka Chahar ChoudharyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 9:12 AM

मुंबई: जवळपास 19 आठवडे म्हणजेच 135 दिवसांनंतर अखेर 12 फेब्रुवारी रोजी बिग बॉसच्या सोळाव्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला. या फिनालेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ग्रँड फिनालेच्या दोन आठवडे आधीपासूनच प्रियांका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांच्या विजेतेपदाविषयी अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र अंतिम निकाल पाहून प्रेक्षकांसह बिग बॉसच्या स्पर्धकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला. कारण रॅपर एमसी स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. बिग बॉसचे माजी स्पर्धक अंकित गुप्ता आणि गौतम विज यांनी खुलेपणे नाराजीही व्यक्त केली होती. आता प्रियांका चहर चौधरीची प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्रियांकाला कलर्स टीव्हीच्या ‘उडारियाँ’ या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. मात्र बिग बॉस 16 मध्ये जेव्हा तिने भाग घेतला, तेव्हा प्रेक्षकांनी आणि सर्व स्पर्धकांनी असा अंदाज वर्तवला होता की चॅनलचा चेहरा असल्याने अखेर प्रियांकाच विजेतेपद मिळवणार. शिवाय पहिल्या दिवसापासून तिची खेळीसुद्धा जबरदस्त होती. मात्र निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या या भविष्यवाणीला खोटं ठरवलं आणि प्रियांकाला टॉप 2 मधूनही बाहेर काढलं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेनंतर प्रियांकाला नुकतंच पापाराझींनी घेरलं. त्यावेळी त्यांनी तिला एमसी स्टॅनविषयी प्रतिक्रिया विचारली. सुरुवातीला तिने तिला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाविषयी प्रतिक्रिया दिली. “माझ्यावर असाच प्रेमाचा वर्षाव करत राहा. प्रेम जितकं मिळेल तितकं कमी असतं”, असं ती म्हणाली. त्यानंतर तिला एमसी स्टॅनविषयी विचारलं असता पुढे म्हणाली, “एमसी स्टॅन अमेझिंग आहे, त्याची पर्सनॅलिटी खरी आहे.” इतकंच बोलून ती तिथून निघून जाते.

प्रियांकाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘एमसी स्टॅनला प्रसिद्धी मिळाली म्हणून सगळे त्याला पसंत करत आहेत. नाहीतर आधी त्याला कोणी विचारत पण नव्हतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘एमसी स्टॅनच्या नावाचा उल्लेख झाला तर मूड बदलला आणि ती निघून गेली’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘बिचारीचा जळफळाट होत असेल पण तरीही चांगलं बोलावं लागत असेल’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भनोट यांच्यामध्ये चुरस रंगली होती. स्टॅन या सिझनचा विजेता ठरला. तर शिव ठाकरे आणि प्रियांका हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.