Bigg Boss 16: प्रियांका धर्मसंकटात; 25 लाख रुपये की अंकित गुप्ता, कोणाला निवडणार अभिनेत्री?

प्रेमाची निवड करणार की पैशांची? प्रियांकासमोर बिग बॉसने ठेवली मोठी अट

Bigg Boss 16: प्रियांका धर्मसंकटात; 25 लाख रुपये की अंकित गुप्ता, कोणाला निवडणार अभिनेत्री?
Bigg Boss 16Image Credit source: Voot
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 11:03 AM

मुंबई: बिग बॉसच्या घरात नेहमीच स्पर्धकांमधील मैत्री आणि नात्याची परीक्षा घेतली जाते. गेल्या काही आठवड्यात बिग बॉसने अनेक स्पर्धकांची अशीच परीक्षा घेतली. या परीक्षेत शालीन भनोट आणि टीना दत्ता यांची मैत्री अपयशी ठरली. तर शिव ठाकरे त्याच्या मित्रांसोबत ठामपणे उभा राहिला. आता अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीसमोर बिग बॉसने अशीच एक अट घातली आहे. या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रियांका धर्मसंकटात सापडल्याचं पहायला मिळतंय.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की प्रियांकाला बिग बॉसने कन्फेशन रुममध्ये बोलावलं. बिग बॉस प्रियांकाला 25 लाख रुपयांची गमावलेली बक्षिसाची रक्कम परत मिळवण्याची संधी देतो. मात्र त्या रकमेच्या बदल्यात बिग बॉसने प्रियांकासमोर ठेवलेली अटसुद्धा तितकीच मोठी आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात प्रियांकाची साथ देणारी एकच व्यक्ती आहे, हे प्रत्येकाला माहीत आहे. तिच्या मैत्रिणी अर्चना आणि सौंदर्यासुद्धा तिला सोडून गेल्या आहेत. त्यानंतर सर्वजण प्रियांका आणि अंकित गुप्ताला टारगेट करत आहेत.

हे सुद्धा वाचा

“तू 25 लाख रुपयांची गमावलेली बक्षिसाची रक्कम परत मिळवू शकते, पण त्याच्या बदल्यात अंकित गुप्ताला आताच घराबाहेर जावं लागेल”, असं बिग बॉस म्हणतो. हे ऐकून प्रियांकाला मोठा धक्का बसतो. दुसरीकडे बिग बॉस काऊंटडाऊन सुरू करतो. त्यामुळे आता ती कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

प्रियांकाने बक्षिसाची रक्कम नाकारत अंकितला निवडलं तर घरात कोणता वाद निर्माण होईल, हे सांगता येत नाही. याआधीही काही सदस्यांनी 25 लाख रुपये गमावले आहेत. त्यामुळे प्रियांकाने अंकितची निवड केल्यास, त्यात काहीच वाईट नाही. सुंबुल तौकिरनेही दोन वेळा 25 लाख रुपये गमावले आहेत. मात्र प्रियांकाने अंकितची निवड केली तर तिला बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांच्या टीकेचा सामना करावा लागणार, हे मात्र नक्की.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.