Bigg Boss 16 Winner | तेजस्वी प्रकाशच्या तोंडून चुकून जाहीर झालं विजेत्याचं नाव; ‘हा’ स्पर्धक ठरणार विजेता?

सध्या बिग बॉसच्या घरात सहा सदस्य राहिले आहेत. यामध्ये शालीन भनोट, शिव ठाकरे, प्रियांचा चहर चौधरी, अर्चना गौतम, एमसी स्टॅन आणि निमृत कौर आहलुवालिया यांचा समावेश आहे.

Bigg Boss 16 Winner | तेजस्वी प्रकाशच्या तोंडून चुकून जाहीर झालं विजेत्याचं नाव; 'हा' स्पर्धक ठरणार विजेता?
Tejasswi PrakashImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 7:26 PM

मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. सोशल मीडियावर आतापासूनच विजेता कोण ठरणार याविषयीची चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेचं तिकिट मिळालेल्या स्पर्धकांच्या नावावरून सोशल मीडियावर सतत ट्रेंड्स समोर येत आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात सहा सदस्य राहिले आहेत. यामध्ये शालीन भनोट, शिव ठाकरे, प्रियांचा चहर चौधरी, अर्चना गौतम, एमसी स्टॅन आणि निमृत कौर आहलुवालिया यांचा समावेश आहे.

बिग बॉसच्या 14 व्या सिझनची विजेती रुबिना दिलैकला नुकताच प्रश्न विचारण्यात आला होता की यंदाच्या सिझनची ट्रॉफी कोणता स्पर्धक पटकावू शकतो? त्यावर तिने प्रियांका चहर चौधरी आणि शिव ठाकरे या दोघांमध्ये तगडी चुरस रंगणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आता बिग बॉसची 15 व्या सिझनची विजेती तेजस्वी प्रकाशनेसुद्धा तिचं मत मांडलं आहे.

हे सुद्धा वाचा

तेजस्वीनेही प्रियांका चहर चौधरीचं नाव घेतलं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चौदाव्या आणि पंधराव्या सिझनच्या विजेत्यांनी त्यांच्या मुलाखतीतून मोठी हिंट दिली आहे. या दोघींच्या मते प्रियांका चहर चौधरी ही सर्वांत स्ट्राँग स्पर्धक आहे. त्यामुळे तीच सोळाव्या सिझनची विजेती ठरणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जर प्रियांका या सिझनची विजेती ठरली तर टेलिव्हिजनची आणखी ‘संस्कारी सून’ बिग बॉसची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणारी असेल. याआधी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना आणि तेजस्वी यांनी विजेतेपद जिंकलं होतं. या दोघींनी प्रियांकाच्या खेळीचं कौतुक केलं.

या दोघींशिवाय अर्जुन बिजलानी, अली गोणी, निक्की तांबोळी, गौहर खान आणि इतर काही सेलिब्रिटींनीही प्रियांका चहर चौधरीचं नाव घेतलं. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही तिच्या नावाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

येत्या 12 फेब्रुवारी रोजी बिग बॉस 16 चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे हिने शिव ठाकरे विजेता ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर बिग बॉस 4 ची स्पर्धक डॉली बिंद्राने निमृतचं नाव घेतलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.