Bigg Boss 16 | सुंबुलला मागे टाकत ‘ही’ ठरली सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक? अर्जुन बिजलानीचा खुलासा

या नऊ जणांमध्ये कोणत्या स्पर्धकाला सर्वाधिक मानधन मिळतं, याची माहिती समोर आली आहे. अभिनेता अर्जुन बिजलानीने यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. बिग बॉसचे एपिसोड्स वाढवल्यानंतर त्यातील स्पर्धकांची फी सुद्धा वाढवण्यात आली आहे.

Bigg Boss 16 | सुंबुलला मागे टाकत 'ही' ठरली सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक? अर्जुन बिजलानीचा खुलासा
Bigg Boss 16 Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 7:47 AM

मुंबई: बिग बॉसच्या सोळाव्या सिझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच कारणामुळे हा शो आणखी काही आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. सध्या बिग बॉसच्या घरात नऊ स्पर्धक आहेत. या नऊ जणांमध्ये कोणत्या स्पर्धकाला सर्वाधिक मानधन मिळतं, याची माहिती समोर आली आहे. अभिनेता अर्जुन बिजलानीने यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. बिग बॉसचे एपिसोड्स वाढवल्यानंतर त्यातील स्पर्धकांची फी सुद्धा वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत या शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ही ‘ईमली’ फेम अभिनेत्री सुंबुल तौकिर खान होती. मात्र आता सुंबुलला मागे टाकत दुसरी स्पर्धक सर्वाधिक मानधन घेणारी ठरली आहे.

अर्जुन बिजलानीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एका मीडियाच्या पोस्टवर ट्विट करत लिहिलं की, शोदरम्यान फी वाढू शकते आणि ती दुप्पटसुद्धा होऊ शकते हे आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. या मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं की प्रियांका चहर चौधरीची फी वाढली आहे आणि आता ती सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात आता सुंबुल दमदार कामगिरी करत नसल्याने तिची फी कमी करण्यात आल्याचं कळतंय. 11 लाख रुपयांवरून आता तिची फी 8 लाख रुपयांवर आली आहे. तर प्रियांका चहर चौधरीची फी 5 लाखांवरून आता 10 लाख रुपये झाली आहे.

बिग बॉसच्या घरात एण्ट्री करण्याआधी स्पर्धक आणि सूत्रसंचालक यांच्यासोबत एक करार केला जातो. या करारात स्पर्धकांना मिळणारी फी आणि कराराची वेळ यांचा उल्लेख असतो. या कराराच्या नियमांमध्ये शो वाढवण्यासंदर्भातही माहिती दिली जाते. मात्र अब्दु रोझिक आणि साजिद खान यांचे आधीचे काही प्रोजेक्ट्स असल्याने, करारात त्यांना सूट देण्यात आली. इतर स्पर्धकांना बिग बॉसचे एपिसोड वाढल्यास, त्याचे नियम पाळणं बंधनकारक असतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.