AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MC Stan | एमसी स्टॅनला मिळाले सर्वांत महागडे गिफ्ट्स; गर्लफ्रेंडकडून BMW बाईक तर सलमानने दिली ‘ही’ खास भेट

स्वत:ला ‘बस्ती का हस्ती’ म्हणवणारा स्टॅनचं नशीबच पालटलं आहे. हा शो जिंकल्यानंतर स्टॅनची गर्लफ्रेंड बुबासुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅनने अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला होता.

MC Stan | एमसी स्टॅनला मिळाले सर्वांत महागडे गिफ्ट्स; गर्लफ्रेंडकडून BMW बाईक तर सलमानने दिली 'ही' खास भेट
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 01, 2023 | 10:50 AM
Share

मुंबई : ‘बिग बॉस 16’चा विजेता एमसी स्टॅन आता देशभरात लोकप्रिय ठरला आहे. बिग बॉसचं विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने सोशल मीडियावरील विक्रम मोडले. विजेता झाल्यानंतरची पहिली पोस्ट आणि पहिलं इन्स्टाग्राम लाइव्हला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने विराट कोहली आणि शाहरुख खानसारख्या सेलिब्रिटींनाही मागे टाकलं. इतकंच नव्हे तर घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर महागड्या भेटवस्तूंचाही वर्षाव झाला. एमसी स्टॅनला कोणाकडून कोणती भेटवस्तू मिळाली, ते पाहुयात..

सलमान खान- बिग बॉस 16 चा सूत्रसंचालक सलमान खानने एमसी स्टॅनला 15 लाख रुपयांचा प्लॅटिनम ब्रेसलेट दिल्याचं कळतंय. विशेष म्हणजे शोदरम्यान एमसी स्टॅनने अनेकदा सलमानकडे घराबाहेर जाण्याची विनंती केली होती.

रोहित शेट्टी- खतरों के खिलाडी 13 चा सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने एमसी स्टॅनला 45 लाख रुपयांची मिनी कूपर कार भेट म्हणून दिली आहे. रोहित शेट्टीचं कारप्रेम हे सर्वांनाच ठाऊक आहे.

बादशाह- रॅपर बादशाहने स्टॅनला 50 लाख रुपयांचा महागडा सोन्याचा हार दिला आहे.

साजिद खान- एमसी स्टॅनचा मित्र आणि बिग बॉस 16 चा माजी स्पर्धक साजिद खाननेही स्टॅनला 3 लाख रुपयांची हिऱ्याची चेन भेट म्हणून दिली आहे.

बुबा- एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड शेख अनम ऊर्फ बुबाने त्याला 45 लाख रुपयांची स्पोर्ट्स बीएमडब्ल्यू बाईक भेट म्हणून दिली आहे.

अब्दु रोझिक- बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनची अब्दु रोझिकशीही चांगली मैत्री झाली. स्टॅनने विजेतेपद जिंकल्यानंतर अब्दुने त्याला सहा लाख रुपयांची Chopard वॉच दिली आहे.

निमृत कौर आहलुवालिया- निमृत कौरसुद्धा मंडलीचा एक भाग आणि एमसी स्टॅनची खास मैत्रीण होती. तिने स्टॅनला अडीच लाख रुपयांचं रोलेक्स घड्याळ दिलं आहे.

कोण आहे एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड बुबा?

एमसी स्टॅन बिग बॉसच्या घरात सर्वांत जास्त त्याची गर्लफ्रेंड बुबाचा उल्लेख करायचा. बिग बॉसच्या घरात त्याच्या पर्सनॅलिटीमुळे आणि बोलण्याच्या अनोख्या अंदाजामुळे प्रसिद्ध झालेल्या रॅपर स्टॅनची गर्लफ्रेंड बुबासुद्धा आता घराघरात प्रसिद्ध झाली आहे. बुबाचं खरं नाव अनम शेख असं आहे. मात्र स्टॅन तिला प्रेमाने बुबा असं म्हणतो. अनम शेखचा जन्म 1998 मध्ये मुंबईत झाला. ती 24 वर्षांची आहे. बुबा हे तिचं टोपणनाव आहे. स्टॅन आणि बुबा एकमेकांना गेल्या बऱ्याच वर्षांपासून डेट करत आहेत. या दोघांचा लग्नाचाही विचार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.