Bigg Boss 16 | कोण आहे विजेता एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड? अनेकांना ठाऊक नाही तिचं खरं नाव

हा शो जिंकल्यानंतर स्टॅनची गर्लफ्रेंड बुबासुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅनने अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला होता. मात्र फार कमी लोकांना बुबाविषयी माहिती आहे.

Bigg Boss 16 | कोण आहे विजेता एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड? अनेकांना ठाऊक नाही तिचं खरं नाव
MC Stan girlfriend BubaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 11:27 AM

मुंबई: शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरी यांसारख्या दोन तगड्या स्पर्धकांना मात देत प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅनने ‘बिग बॉस 16’ची ट्रॉफी पटकावली. या विजयानंतर एमसी स्टॅन सध्या संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. स्वत:ला ‘बस्ती का हस्ती’ म्हणवणारा स्टॅनचं नशीबच पालटलं आहे. हा शो जिंकल्यानंतर स्टॅनची गर्लफ्रेंड बुबासुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅनने अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला होता. मात्र फार कमी लोकांना बुबाविषयी माहिती आहे.

कोण आहे बुबा?

एमसी स्टॅन बिग बॉसच्या घरात सर्वांत जास्त त्याची गर्लफ्रेंड बुबाचा उल्लेख करायचा. बिग बॉसच्या घरात त्याच्या पर्सनॅलिटीमुळे आणि बोलण्याच्या अनोख्या अंदाजामुळे प्रसिद्ध झालेल्या रॅपर स्टॅनची गर्लफ्रेंड बुबासुद्धा आता घराघरात प्रसिद्ध झाली आहे. बुबाचं खरं नाव अनम शेख असं आहे. मात्र स्टॅन तिला प्रेमाने बुबा असं म्हणतो.

अनम शेखचा जन्म 1998 मध्ये मुंबईत झाला. ती 24 वर्षांची आहे. बुबा हे तिचं टोपणनाव आहे. स्टॅन आणि बुबा एकमेकांना गेल्या बऱ्याच वर्षांपासून डेट करत आहेत. या दोघांचा लग्नाचाही विचार आहे.

हे सुद्धा वाचा

बुबासाठी स्टॅनने सोडली पहिली गर्लफ्रेंड

एमसी स्टॅन आणि बुबाची लव्ह स्टोरी फारच फिल्मी आहे. त्याने अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्मासमोर बिग बॉसच्या घरात सांगितलं होतं की बुबाशी भेटल्यानंतर त्याने पहिल्या गर्लफ्रेंडला सोडलं होतं. “मी आधी एका मुलीला डेट करत होतो. ती मला खूप पसंत करायची. मात्र माझ्या बाजूने फार काही नव्हतं. नंतर जेव्हा मी बुबाशी भेटलो तेव्हा मी पहिल्या गर्लफ्रेंडसमोर सर्व गोष्टी स्पष्ट केल्या. मला अनम आवडत असल्याचं तिला सांगितलं”, असं स्टॅन म्हणाला होता.

एमसी स्टॅन त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी पालकांशिवाय फक्त मित्रांसोबत स्थळ घेऊन पोहोचला होता. याविषयी त्याने सांगितलं, “आम्ही 30-40 जण स्थळ घेऊन तिच्या घरी पोहोचलो होतो. तिथे सर्वांना रांगेत उभं केलं होतं. तुमच्या मुलीला पळवून नेऊ. त्याआधी कोणताही वाद न घालता तिचं लग्न माझ्याशी करून द्या, असं स्टॅन बुबाच्या आईवडिलांना म्हणाला. त्यावर ते स्टॅनला म्हणाले की, आधी तुझ्या आईवडिलांना घरी पाठव, पुन्हा तू असं येऊ नकोस.”

बुबाशी लवकरच करणार लग्न

बिग बॉसच्या फिनाले वीकच्या आधी फॅमिली वीक पार पडला होता. त्यावेळी एमसी स्टॅनची आई वहिदाने खुलासा केला होता की स्टॅनची गर्लफ्रेंड त्यांच्या घरी त्यांना भेटायला आली होती. हे दोघं पुढच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लग्न करणार असल्याचं कळतंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.