MC Stan | ‘बस्ती का हस्ती’ एमसी स्टॅनची कमाल लाइफस्टाइल; स्वत:वर खर्च करतो इतके कोटी रुपये

'तडीपार' आणि 'इन्सान थे' हे एसमी स्टॅनचे दोन बॅक टू बॅक अल्बम्स हिट झाले आणि त्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. देसी हिप-हॉपमध्ये त्याने स्वत:ची वेगळी ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये एमसी स्टॅनचा स्वभाव चाहत्यांना जवळून पाहता आला.

MC Stan | 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅनची कमाल लाइफस्टाइल; स्वत:वर खर्च करतो इतके कोटी रुपये
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 12:57 PM

मुंबई : पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन ऊर्फ अल्ताफ शेख हा नुकताच ‘बिग बॉस 16’चा विजेता ठरला. या शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरात त्याची अब्दु रोझिक आणि शिव ठाकरे यांच्याशी चांगली मैत्री झाली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर स्टॅनविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकत्याच एका शोदरम्यान स्टॅनने सांगितलं की त्याचे शूज, ज्वेलरी आणि टी-शर्टची किंमत किती आहे, ज्याची नेहमी इतकी चर्चा होते.

‘तडीपार’ आणि ‘इन्सान थे’ हे एसमी स्टॅनचे दोन बॅक टू बॅक अल्बम्स हिट झाले आणि त्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. देसी हिप-हॉपमध्ये त्याने स्वत:ची वेगळी ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये एमसी स्टॅनचा स्वभाव चाहत्यांना जवळून पाहता आला. मात्र आता त्याच्या लाइफस्टाइलविषयी जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता आहे.

हे सुद्धा वाचा

एमसी स्टॅनचे शूज, ज्वेलरी आणि टी-शर्टची किंमत

एका आरजेने एमसी स्टॅनला विचारलं की, “दररोज तुझ्या शूजवर आणि हेअरस्टाइलवर किती खर्च करतोस?” त्यावर उत्तर देताना स्टॅन म्हणाला, “दररोज 1 लाख 20 हजार रुपये खर्च होतात. माझी टी-शर्ट 45 हजार रुपयांची आहे.” त्यानंतर स्टॅनला त्याच्या ज्वेलरीची किंमत विचारण्यात आली. तेव्हा तो म्हणाला, ‘दीड’. आरजेने विचारलं की ‘दीड काय? लाख रुपये का?’ त्यावर स्टॅन म्हणतो, “दीड कोटी रुपये”. यानंतर तो पुढे म्हणतो की, “मरण्याआधी सगळं करायचं आहे भावा, फटाफट!”

View this post on Instagram

A post shared by MC STΔN ? (@m___c___stan)

एमसी स्टॅन अनेकदा इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन त्याची लाइफस्टाइल दाखवतो. एका लाइव्हदरम्यान त्याने चाहत्यांना त्याचे 80 हजार रुपयांचे शूज दाखवले होते. बिग बॉसच्या घरातही त्याने महागडे चेन, कडे आणि सोन्याची अंगठी यांसारखे ज्वेलरी वापरले आहेत. एका एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने रॅपरला त्याच्या ज्वेलरीची किंमत विचारली. तेव्हा स्टॅनने त्याची किंमत जवळपास दीड कोटी रुपये असल्याचं सांगितलं होतं.

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी एमसी स्टॅनने त्याच्या आईसाठी 70 हजार रुपयांचा टीव्ही घेऊन दिला होता. त्याची एकूण संपत्ती ही जवळपास 20 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.

बिग बॉसचं विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने सोशल मीडियावरील विक्रम मोडले. विजेता झाल्यानंतरची पहिली पोस्ट आणि पहिलं इन्स्टाग्राम लाइव्हला नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने विराट कोहली आणि शाहरुख खानसारख्या सेलिब्रिटींनाही मागे टाकलं. इतकंच नव्हे तर घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर महागड्या भेटवस्तूंचाही वर्षाव झाला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.