MC Stan ला जीवे मारण्याचा रचला होता कट; वाढदिवशीच डोळ्यांसमोर मित्राची झाली होती हत्या

‘तडीपार’ आणि ‘इन्सान थे’ हे एसमी स्टॅनचे दोन बॅक टू बॅक अल्बम्स हिट झाले आणि त्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. देसी हिप-हॉपमध्ये त्याने स्वत:ची वेगळी ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये एमसी स्टॅनचा स्वभाव चाहत्यांना जवळून पाहता आला.

MC Stan ला जीवे मारण्याचा रचला होता कट; वाढदिवशीच डोळ्यांसमोर मित्राची झाली होती हत्या
Mc stan
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 2:34 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’च्या सोळाव्या सिझनचा विजेता ठरल्यानंतर रॅपर एमसी स्टॅन सतत चर्चत आहे. दिवसेंदिवस त्याच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र इथपर्यंत पोहोचणं एमसी स्टॅनसाठी सोपं नव्हतं. ‘बस्ती की हस्ती’ म्हणून ओळखला जाणारा एमसी स्टॅन बिग बॉसच्या घरात अनेकदा त्याच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अशी एक घटना सांगितली, जे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नुकत्याच दिलेल्या या मुलाखतीत एमसी स्टॅनने त्याच्या एका मित्रासोबत घडलेल्या भयानक घटनेचा खुलासा केला. मित्राच्या वाढदिवशीच एमसी स्टॅनने त्याला गमावलं होतं. इतकंच नव्हे तर स्टॅनच्या डोळ्यांसमोरच त्याच्या मित्राची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

“एक वेळ अशी होती जेव्हा माझ्या आजूबाजूला फक्त समस्याच होत्या. माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता. तो केक कापत होता, तेव्हा त्याच्या मानेवर एकाने चाकू ठेवला आणि अत्यंत निर्घृणपणे त्याची हत्या केली. हे सर्व माझ्या डोळ्यांसमोरच घडलं होतं. माझ्यासमोर माझ्या मित्राची हत्या करण्यात आली होती. त्याच्या गळ्यावर चाकूने बरेच वार करण्यात आले होते. ती घटना आठवली की आजही..”, असं सांगत असतानाच त्याचा कंठ दाटून येतो. एमसी स्टॅन पुढे म्हणतो, “काही लोकांनी माझाही जीव घेण्याचा कट रचला होता. मला मारण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मी तिथून पळालो.”

बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केल्यानंतर कुटुंबीयांची कशी प्रतिक्रिया होती, असा प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं, “माझे आईवडील अक्षरश: रडत होते. मी कुठून आलो आणि कुठपर्यंत पोहोचलो, हे त्यांना ठाऊक आहे. त्यांचे ते शब्द अमूल्य होते.”

बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅनचं नशीब पालटलं आहे. तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं कळतंय. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटासाठी तो रॅप करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप स्टॅनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.