मुंबई | 24 जानेवारी 2024 : बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर आहे. थोड्याच दिवसात या शो ला नवा विजेता मिळाणार आहे. मात्र तोपर्यंत अनेक महत्वाचे स्पर्धक शो मधून बाहेर पडले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे समर्थ जुरैल. समर्थने या शोमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. शोमध्ये तो खूप मस्ती करताना आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. एकीकडे तो अभिषेक कुमारसोबत प्रचंड भांडताना दिसला. त्यांच्यात वादही झाले. तर दुसरीकडे विकी जैन आणि अंकिता लोखंडेसोबतचे त्याचे मैत्रीचे बंधही पाहायला मिळाले. आता समर्थ शोमधून बाहेर पडला असून, तर तो या शोशी संबंधित अनेक गोष्टी सांगत आहे. नुकताच त्याने विकी जैनबद्दल खुलासा केला आहे.
चार-चार दिवस अंघोळ करत नाही विकी जैन
समर्थ जुरेल यांने नुकतंच कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्यासोबत एक पॉडकास्ट केले आहे. या पॉडकास्टमध्ये समर्थने बिग बॉसच्या घराबद्दल, तिथल्या स्पर्धकांबद्दल बऱ्याच गप्पा मारल्या. त्याच दरम्यान समर्थने विकी जैनच्या एका सवयीबद्दल सांगितले आहे. विकी किती अस्वच्छ आहे हे अभिनेत्याने सांगितले आहे. खरं तर, जेव्हा भारती सिंहने समर्थला (मजेत) विचारलं की, या शोमध्ये घरात अशी कोण व्यक्ती होती, जी अंघोळ करायची नाही. त्यावर समर्थने थेट विकी जैन याचं नाव घेतलं. समर्थने सांगितलं की, विकीने 3-4 दिवस अंघोल केली नाही. एकदा तर विकीने अंघोळ न करण्याचा विक्रम केला होता. त्याने 3 दिवस तेच कपडे घातले.
त्यानंतर भारती आणि हर्ष यांनी विचारले की, विकी घरात ब्रँडेड कपडे घालतो का ? त्यावर समर्थ म्हणाला, त्याला (ब्रँडेड कपडे घालण्याची) आवड आहे, शौकिन माणूस आहे तो… फक्त त्याला अंघोळ करण्याची आवड नाही, अशा शब्दात त्याने विकीच पोलखोल केली. त्याने पुढे अंकिताबद्दलही सांगितलं. अंकिताकडे खूप कपडे आहेत. आमच्या घरात जेवढे कपडे नसतील, तेवढे कपडे तर एकट्या अंकिताकडे आहे. आता यात तिचाही दोष नाही, असं तो म्हणाला. .
200 आउटफिट शोमध्ये नेले ?
हा शो सुरू होताना अशी चर्चा होती की अंकिताने घरात 200 आउटफिट्स नेले आहेत. त्याबद्दलही भारतीने समर्थला प्रश्न विचारला. हे खरं आहे का ? त्यावर समर्थ म्हणाला – ती तिच्यासोबत 200 कपडे तर घेऊन आली होती. आणि बाहेरून तिच्यासाठी आणखी कपडे यायचे.
28 जानेवारीला होणार ग्रँड फिनाले होणार
बिग बॉसच्या या सीझनचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडेल. सध्या शोमध्ये फक्त अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, विकी जैन, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण महाशेट्टी उरले आहेत. पण ‘द खबरी’ने दिलेल्या वृत्तानुसार, विकी जैन या आठवड्याच्या मध्यात शोमधून बाहेर पडणार आहे. 28 जानेवारीला बिग बॉस या सीझनचा फिनाले होणार असून शोचा नवा विजेता देखील जाहीर होईल.