सुशांत सिंह राजपूत याच्यामुळे अंकिता लोखंडेवर आई नाराज, थेट सुनावले खडेबोल, अगोदर सासू आणि आता आईनेच..
बिग बॉस 17 तूफान चर्चेत आहे. बिग बॉस 17 मध्ये मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाले आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये जोरदार वाद हा बिग बॉस 17 च्या घरात सतत बघायला मिळतोय.
मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे सध्या अंकिता लोखंडे हेच नाव चर्चेत आहे. नुकताच अंकिता लोखंडे हिची सासू आणि विकी जैन याची आई रंजना जैन आणि अंकिता लोखंडे हिची आई बिग बॉस 17 च्या घरात गेल्या होत्या. यावेळी अंकिता लोखंडे आणि तिच्या सासूमध्ये खटके उडताना दिसले. इतकेच नाही तर काहीही असेल तर मला बोला माझ्या आई वडिलांनामध्ये आणू नका हे सांगताना अंकिता लोखंडे ही दिसली. हेच नाही तर रंजना जैन यांनी बिग बॉस 17 च्या घरातून बाहेर आल्यानंतरही अनेक आरोप हे अंकिता लोखंडे हिच्यावर केले.
अंकिता लोखंडे आणि तिच्या सासूमधील वाद वाढताना दिसतोय. अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 च्या घरात सतत सुशांत सिंह राजपूत याचे नाव घेत असल्याचे देखील तिच्या सासूने म्हटले. आता यावरूनच अंकिता लोखंडे हिच्या आईने देखील तिला चांगलेच खडेबोल सुनावल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर अंकिता लोखंडे हिला तिच्या आईने सल्ला देखील दिलाय.
अंकिता लोखंडे हिच्या आईने तिला सांगितले की, तिने तिच्या भूतकाळावर बोलणे टाळावे. मात्र, यावेळी सुशांत सिंह राजपूत याचे नाव घेणे तिच्या आईने टाळल्याचे बघायला मिळाले. परंतू तिच्या आईने थेट सांगितले की, तिने अजिबातच भूतकाळावर (सुशांतवर) बोलू नये. यानंतर अंकिताने आश्चर्यचकित होऊन विचारले की मी नेहमी त्याच्याबद्दल बोलते का?
अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 च्या घरात सतत सुशांत सिंह राजपूत याचे नाव घेताना दिसत आहे. अनेकांनी ही सहानुभूती मिळवण्यासाठी करत असल्याचे देखील म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या नावाचा सतत उल्लेख करताना अंकिता लोखंडे ही बिग बॉस 17 च्या घरात दिसत आहे. सुशांतच्या चाहत्यांना देखील हे आवडले नाहीये.
बिग बॉस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद हे बघायला मिळत आहेत. हेच नाही तर अंकिता लोखंडे हिने एका भांडणामध्ये चक्क विकी जैन याला लाथ मारल्याचे बघायला मिळाले. हेच विकी जैन याच्या घरच्यांना अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसतंय. आता विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामधील वाद हा वाढताना दिसतोय.