Bigg Boss 17 | कन्फर्म स्पर्धकांची यादी समोर; शोमध्ये जाण्यासाठी अंकिता लोखंडेकडून मोठी तयारी

बिग बॉसचा 17 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याची यादी चर्चेत आली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेचं नाव समोर आलं आहे. पती विकी जैनसोबत ती यामध्ये सहभागी होणार आहे.

Bigg Boss 17 | कन्फर्म स्पर्धकांची यादी समोर; शोमध्ये जाण्यासाठी अंकिता लोखंडेकडून मोठी तयारी
Bigg Boss 17Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 11:35 AM

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा 17 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोविषयी चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे. त्याचा नवीन प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने यंदाच्या सिझनचा थीम सांगितला आहे. यावेळी सिंगल आणि कपल्स या शोमध्ये सहभागी होणार आहेत. बिग बॉसचा नवा सिझन नेमका कधीपासून सुरू होणार, याची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. मात्र त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं समोर येत आहेत. त्यापैकी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन या जोडीच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

‘बिग बॉस 17’मध्ये कोण सहभागी होणार?

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत राहिलेली बेबिका धुर्वे आता बिग बॉसच्या 17 व्या सिझनमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचं कळतंय. त्याचसोबत ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेचंही नाव जोरदार चर्चेत आहे. पती विकी जैनसोबत ती कपल एण्ट्री घेणार असल्याचं कळतंय. यासोबतच अभिषेक कुमार, ईशा मालविय, ईशा सिंग, हर्श बेनीवाल, समर्थ जुरेल, खुशी पंजाबन आणि विवेक चौधरी हे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचं समजतंय.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या अकराव्या सिझनमध्ये रनरअप राहिलेली अभिनेत्री हिना खान तिच्या विविध स्टाइल्सच्या कपड्यांमुळे चर्चेत राहिली होती. बिग बॉसच्या घरात असताना तिने एकही ड्रेस पुन्हा घातला नव्हता. आता अंकिता लोखंडे हिनाचा हा रेकॉर्ड मोडणार असल्याचं दिसतंय. कारण शोमध्ये सहभागी होण्यासाठी तिने चांगलीच तयारी केली आहे. ती तब्बल 200 ड्रेसेस घेऊन बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचं कळतंय.

याशिवाय ड्रामा क्वीन राखी सावंतचा पती आदिल दुर्रानीसुद्धा बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शोच्या निर्मात्यांनी जेव्हा आदिलशी संपर्क साधला होता, तेव्हा तो विविध कायदेशीर गोष्टींमध्ये व्यग्र होता. त्यामुळे त्याने नेमकं उत्तर तेव्हा निर्मात्यांना दिलं नव्हतं.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.