AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारंवार लेहेंगा घालणार नाही, ऐश्वर्याने सलमान खान याला सुनावले

Salman Khan : नाराज ऐश्वर्या हिने सलमान खान सुनावले खडेबोल... विषय नक्की काय? लेहेंग्यामुळे का झाली ऐश्वर्या आणि सलमान यांच्यामध्ये भांडणं... कारण जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि ऐश्वर्या यांच्यातील वादाची चर्चा...

वारंवार लेहेंगा घालणार नाही, ऐश्वर्याने सलमान खान याला सुनावले
| Updated on: Dec 14, 2023 | 12:08 PM
Share

मुंबई| 14 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेता ‘बिग बॉस’च्या होस्ट भूमिकेत असल्यामुळे अभिनेत्याच्या चर्चा सर्वत्र रंगत असतात. शिवाय चाहते देखील ‘विकेंड का वॉर’च्या प्रतीक्षेत असतात. पण आता ‘बिग बॉस 17’ ची स्पर्धक ऐश्वर्या शर्मा हिने नाराजी व्यक्त केली आहे. सांगायचं झालं तर घरात ऐश्वर्या हिचं इतर स्पर्धक आणि पतीसोबत पटत नसल्याचं दिसून येत आहे.

‘बिग बॉस’मध्ये असा एकही स्पर्धक नाही, ज्याच्यासोबत ऐश्वर्या हिचे वाद झाले नाहीत. आता मिळत असलेल्या माहितीनुसार ‘गुम है किसी के प्यार में’ मधील ‘पाखी’म्हणजे ऐश्वर्या हिने तिच्या टीमवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

सांगयचं झालं तर, बिग बॉसमध्ये बंद असलेल्या स्पर्धकांचं कपडे, मेक-अप, औषधं.. घरात पाठवण्याचं काम स्पर्धकांची टीम करते. गुरुवार, १४ डिसेंबर रोजी स्पर्धकांच्या टीमने ‘वीकेंड का वार’च्या शूटिंगसाठी कपडे पाठवले होते, पण ऐश्वर्या शर्माला तिच्या टीमने पाठवलेले कपडे अजिबात आवडले नाहीत.

ऐश्वर्या शर्मा हिला तिच्या टीमने एक सुंदर लेहेंगा दिला होता, पण ऐश्वर्या शर्मा म्हणाली की तिला हा लेहेंगा घालायचा नव्हता. नाराज ऐश्वर्या हिला ईशा मालवीय हिने समजवण्याचा प्रयत्न केला. पण ऐवर्या हिची नाराजी दूर झाली नाही.  ईशा मालवीया हिने संतापलेल्या ऐश्वर्या हिला साडी नेसण्याचा सल्ला दिला तेव्हा ऐश्वर्या म्हणाली, तिला पारंपरिक कपडे घालायचे नाहीत. एवढंच नाही तर यावेळी नीलची टीम ऐश्वर्याच्या रागाची शिकार झाली.

ऐश्वर्या म्हणाली, “हे लोक काय करत आहेत हे मला माहीत नाही. एक काम यांच्याकडून होत नाही. दोन महिने झाले.” ऐश्वर्या हिने ‘वीकेंड का वार’साठी अनेकदा पारंपरिक कपडे घातले आहे. आता तिला नव्या स्टाईलचे कपडे घालण्याची इच्छा देखील व्यक्त केली.

ऐश्वर्या हिला सलमान खान याच्या प्रत्येक ‘वीकेंड का वार’साठी नव्या स्टाईलचे कपडे घालायचे आहेत. कारण कपड्यांच्या स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चा होते. ज्यामुळे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळू शकते… ‘मला पारंपरिक कपड्यांसाठी माझा विरोध नाही, पण ‘वीकेंड का वार’साठी मला स्टाईलचे कपडे घालायचे आहेत…’ अशी इच्छा देखील ऐश्वर्या हिने व्यक्त केली.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.