‘बिग बॉस 17’मधील कोणत्या स्पर्धकाला पाठिंबा? सुनील शेट्टीचं अनपेक्षित उत्तर

'बिग बॉस 17'चं विजेतेपद कोण पटकावणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. विजेत्याचं नाव घोषित होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यापूर्वी अभिनेता सुनील शेट्टीने कोणत्या स्पर्धकाला पाठिंबा देणार, या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. यावेळी त्याने अनपेक्षित नाव घेतलं आहे.

'बिग बॉस 17'मधील कोणत्या स्पर्धकाला पाठिंबा? सुनील शेट्टीचं अनपेक्षित उत्तर
Suniel ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 8:55 PM

मुंबई : 28 जानेवारी 2024 | तब्बल 105 दिवसानंतर ‘बिग बॉस 17’ हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून बिग बॉसच्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या टॉप 5 स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे. ग्रँड फिनालेमध्ये प्रेक्षकांना बरेच मनोरंजक कार्यक्रम पहायला मिळणार आहेत. त्याचसोबत काही सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात येणार आहेत. यामध्ये अभिनेता सुनील शेट्टीचाही समावेश आहे. सुनील शेट्टी त्याच्या आगामी ‘डान्स दिवाने’ या शोच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या घरात जाणार आहे. त्यापूर्वी पापाराझींनी त्याला बिग बॉसच्या विजेत्याविषयी प्रश्न विचारला. कोणत्या स्पर्धकाला तुझा पाठिंबा असेल, असा प्रश्न विचारला असता त्यावर सुनील शेट्टीने भन्नाट उत्तर दिलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुनील शेट्टीचा कोणाला पाठिंबा?

सुनील शेट्टीचा व्हिडीओ एका पापाराझी अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने जाण्यापूर्वी पापाराझींशी गप्पा मारताना दिसत आहे. यावेळी त्याने काळ्या रंगाचा सूट आणि त्यावर गॉगल लावला होता. बिग बॉसमध्ये तुम्ही कोणाला पाठिंबा देत आहात, असा प्रश्न विचारल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, “सलमान भाईला माझा पाठिंबा असेल.” हे ऐकून पापाराझीसुद्धा हसतात.

हे सुद्धा वाचा

सुनील शेट्टी आणि सलमान खान यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जय हो’ या चित्रपटात दोघांनी स्क्रीन शेअर केला होता. विशेष म्हणजे 2015 मध्ये सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने सलमान खानच्या प्रॉडक्शन अंतर्गत निर्मित झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘हिरो’ असं या चित्रपटाचं नाव होतं.

‘बिग बॉस 17’ हा शो संपल्यानंतर त्या वेळेत कलर्स टीव्हीवर सुनील शेट्टीचा ‘डान्स दिवाने’ हा शो सुरू होणार आहे. हा लहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो असून यामध्ये सुनील शेट्टी परीक्षक असेल. अभिनेत्री माधुरी दीक्षितसुद्धा या शोमध्ये परीक्षकेच्या भूमिकेत असेल. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्ये आर. माधवन आणि अजय देवगणसुद्धा सहभागी होणार आहेत. आगामी ‘शैतान’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ही जोडी बिग बॉसच्या घरात येणार आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.