कधी, कुठे पाहू शकाल ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले? फोनवरही पाहू शकाल Live टेलीकास्ट

बिग बॉसच्या सतराव्या सिझनचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. बिग बॉसच्या घरात पाच स्पर्धक राहिले असून त्यांच्यात ट्रॉफीसाठी चुरस रंगली आहे. या शोचा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहता येईल, ते जाणून घेऊयात..

कधी, कुठे पाहू शकाल 'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले? फोनवरही पाहू शकाल Live टेलीकास्ट
bigg boss 17 top 5 contestantsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 3:41 PM

मुंबई : 25 जानेवारी 2024 | टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या बिग बॉसच्या घरात पाच स्पर्धक राहिले आहेत. अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी या पाच स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली आहे. या पाच जणांपैकी कोणता स्पर्धक विजेता ठरणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या लोकप्रिय शोचा ग्रँड फिनाले कधी आणि कुठे पाहता येईल, विजेत्याला बक्षीसाची रक्कम किती मिळणार, याबद्दलची माहिती जाणून घेऊयात..

मोबाइल फोनवर कसं पाहू शकता लाइव्ह टेलीकास्ट?

येत्या 28 जानेवारी रोजी कलर्स टीव्हीवर ‘बिग बॉस 17’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. रविवारी सूत्रसंचालक सलमान खान या शोच्या विजेत्याचं नाव घोषित करणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच जवळपास सहा तासांचा हा ग्रँड फिनाले असेल. कलर्स टीव्हीशिवाय तुम्ही हा शो तुमच्या फोनवर ऑनलाइनसुद्धा पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये जियो सिनेमाचा अॅप डाऊनलोड करावा लागेल. त्यावर तुम्ही ‘बिग बॉस 17’ लाइव्हवर क्लिक करून या सिझनचा ग्रँड फिनाले पाहू शकता. हा शो तुम्हाला मोफत लाइव्ह पाहता येणार आहे.

बक्षीसाची रक्कम

‘बिग बॉस 17’च्या विजेत्याला ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. मात्र ही रक्कम अद्याप पूर्णपणे निश्चित करण्यात आली नाही. कारण प्रत्येकवेळी शोच्या ग्रँड फिनालेच्या आधी सुटकेसचा ट्विस्ट पहायला मिळतो. बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांना 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची ऑफर दिली जाते. हे पैसे घेऊन त्या स्पर्धकाला माघार घेता येते. त्यामुळे मूळ बक्षिसाची रक्कम कमी होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस 17’च्या विजेत्याला ट्रॉफी आणि जिंकलेल्या रकमेसोबतच आणखी एक खास भेटवस्तू मिळणार आहे. याबद्दलची माहिती करण जोहरने शोदरम्यान दिली होती. वीकेंड का वार एपिसोडमध्ये त्याने एका कारच्या ब्रँडचे सीईओ तरुण गर्ग यांचं स्वागत केलं होतं. त्यांनी स्पर्धकांचीही भेट घेतली होती. तरुण गर्ग यांनी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणला त्यांच्या कारचे ब्रँड अॅम्बेसिडर असल्याचं सांगत हुंडाई क्रेटाच्या लाँचची घोषणा केली होती. यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की शोच्या विजेत्याला आलिशान कारसुद्धा भेट म्हणून मिळणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.