अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीच्या रिपोर्टविषयी जिग्ना वोराकडून मोठा खुलासा

रिंकू धवन आणि जिग्ना वोरा यांच्याशी बोलताना अंकिता म्हणते की तिला आंबट खाण्याची इच्छा होत आहे. इतकंच नव्हे तर दिवसभर ती किचनमध्ये लोणच्याच्या शोधात असते. त्यामुळे अंकिता लवकरच गुड न्यूज देणार का, अशा चर्चांना उधाण आलं होतं.

अंकिता लोखंडेच्या प्रेग्नंसीच्या रिपोर्टविषयी जिग्ना वोराकडून मोठा खुलासा
Jigna Vora and Ankita LokhandeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 12:43 PM

मुंबई : 29 नोव्हेंबर 2023 | ‘बिग बॉस 17’ या शोच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं की एखाद्या स्पर्धकाच्या प्रेग्नंसीची चर्चा झाली असेल. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेरची खूप चर्चेत आहे. अंकिताने बिग बॉसच्या घरात प्रेग्नंसीची टेस्ट केली. मात्र तिच्या टेस्टचा रिपोर्ट काय आला आणि ती खरंच गरोदर आहे का, हे अद्याप स्पष्ट झालं नव्हतं. अंकिताने तिचा पती विकी जैनला सांगितलं होतं की तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली आहे. मात्र यानंतर बिग बॉसच्या घरात ती याविषयी बोलताना दिसलीच नाही. नावीद सोलने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अंकिताच्या प्रेग्नंसीबद्दल इशारा दिला होता. ‘सर्वकाही योग्य दिशेने सुरू आहे’, असं तो म्हणाला होता. त्यानंतर आता घरातून बाहेर पडलेली दुसरी स्पर्धक जिग्ना वोराने अंकिताच्या गरोदरपणाविषयी मोठा खुलासा केला आहे.

शोमधून बाहेर पडल्यानंतर जिग्नाने काही मुलाखती दिल्या आहेत. यापैकी एका मुलाखतीत तिला अंकिताच्या गरोदरपणाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मी आणि रिंकूजींनी या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं होतं. मी स्वत: एक आई असल्यामुळे ही गोष्ट मला माहीत आहे की प्रेग्नंसीमध्ये आंबड खाण्याची इच्छा होणं हे गरजेचं नाही. हे फक्त हिंदी चित्रपटांमध्ये होतं. पण जेव्हा मी बाहेर पडली आणि पत्रकार परिषदेत मला विचारलं गेलं की ही स्ट्रॅटेजी असू शकते का? तेव्हा मी चकीत झाले होते. तेव्हा पहिल्यांदा मला वाटलं की ही सर्व स्ट्रॅटेजी असू शकते.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

जिग्नाने पुढे सांगितलं की शोमध्ये एण्ट्री करण्यापूर्वी सर्व स्पर्धकांची रक्त तपासणी झाली होती. जर ती खरंच गरोदर असती तर तेव्हाच समजलं असतं. अंकिताने प्रकाशझोतात येण्यासाठी प्रेग्नंसीचं नाटक केलं असावं, असंही ती म्हणाली. शनिवारी 25 नोव्हेंबर रोजी जिग्ना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत जिग्ना म्हणाली, “जोपर्यंत मला माहीत आहे, तिच्या प्रेग्नंसी चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तिने स्वत: मला सांगितलं होतं. मला त्याबद्दल फारसं बोलायचं नाहीय, कारण हा तिचा खासगी विषय आहे.”

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.