आता चाहत्यांना मिळणार ‘बिग बॉस’च्या घरात राहण्याची संधी; सलमान खानने दिली गुड न्यूज!

बिग बॉसचं घर याविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. हे घर आतून पाहण्याची संधी एकदा तरी मिळावी, अशी असंख्य प्रेक्षकांची इच्छा असते. हीच इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. खुद्द सलमान खानने याविषयी निर्मात्यांकडे विनंती केली आहे. बिग बॉसच्या चाहत्यांना घरात राहण्याची संधी द्यावी, असं त्याने म्हटलंय.

आता चाहत्यांना मिळणार 'बिग बॉस'च्या घरात राहण्याची संधी; सलमान खानने दिली गुड न्यूज!
Bigg Boss houseImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 9:04 AM

मुंबई : 8 जानेवारी 2024 | बिग बॉस हा टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो आहे. सध्या या शोचा सतरावा सिझन सुरू असून त्यालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक नवीन सिझन सुरू होण्याआधी सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजे त्यातील स्पर्धकांची यादी जाणून घेण्याची आणि बिग बॉसच्या घराचं इंटेरिअर डिझाइन पाहण्याची. एकदा तरी बिग बॉसचं घर पहायला मिळावं अशी अनेकांची इच्छा आहे. हीच इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचं चित्र दिसतंय. कारण खुद्द सलमान खानने निर्मात्यांना तशी विनंती केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये सलमानने थेट निर्मात्यांना याबद्दलची विनंती केली. बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडल्यानंतर चाहत्यांना घरात राहण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्याने केली आहे.

‘वीकेंड का वार’ एपिसोड संपताना सलमान म्हणाला, “बिग बॉस, मी असं ऐकलंय की तुमचे चाहते तुमच्याकडे विनंती करत आहेत की त्यांनासुद्धा बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळावी. तर त्यांनासुद्धा या आलिशान घरात राहण्याची संधी दिली जावी. या सिझनचे स्पर्धक जेव्हा घराबाहेर जातील, अर्थात ग्रँड फिनालेनंतर, तेव्हा चाहत्यांना घरात राहण्याची एक संधी नक्की द्यावी.” सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर बिग बॉसच्या चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘सल्लू भाई रॉक्स’, असं एकाने लिहिलं. तर ‘सलमान खरंच त्याच्या चाहत्यांवर खूप प्रेम करतो, त्यांचा विचार करतो’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

हे सर्व काही ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवच्या एका पोस्टनंतर झालं. एल्विशने सोशल मीडियावर सलमानच्या घराबाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांचा फोटो पोस्ट केला होता. ‘आम्हाला बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी द्या’, असे होर्डिंग्स हातात घेऊन हे चाहते सलमानच्या घराबाहेर उभे होते. ‘सलमान भाई, काहीतरी सिस्टम लाव आणि या चाहत्यांना एण्ट्री दे’, अशी विनंती तो सलमानला या पोस्टद्वारे करतो. त्यानंतर सलमानने बिग बॉसच्या एपिसोडमध्ये थेट निर्मात्यांना विनंती केली.

सलमानने विनंती केल्यानंतर बिग बॉसच्या निर्मात्यांनी ती ऐकावीच लागेल. कारण सलमान हा त्यांचा सर्वांत आवडता सूत्रसंचालक आहे. तो शोमध्ये यावा यासाठी ते त्याची प्रत्येक अट मान्य करतात. त्यामुळे चाहत्यांना लवकरच बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळणार, हे मात्र नक्की!

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.