Bigg Boss 17 चा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित; सलमान खान दिसणार वेगळ्याच अंदाजात
Bigg Boss 17 चा प्रोमो पाहून व्हाल थक्क... सलमान खान याला 'अशा' अंदाजात पाहिल्यानंतर म्हणाल...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस 17' ची चर्चा.. पाहा प्रोमो..
मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | ‘बिग बॉस’ या वादग्रस्त शोला चाहते कायम उत्तम प्रतिसाद देत असतात. ‘बिग बॉस’ शोच्या 16 सीझननंतर चाहते ‘बिग बॉस 17’ च्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी’ च्या दोन सीझनला देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. आता ‘बिग बॉस 17’ची चर्चा रंगत आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये कोण स्पर्धक असतील. ‘बिग बॉस 17’ शोची थीम नक्की कोणती असेल… अशा अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या आहेत. ‘बिग बॉस 17’ ची चर्चा चाहते आणि सेलिब्रिटींमध्ये रंगत असताना, निर्मात्यांनी ‘बिग बॉस 17’ शोचा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस 17’ शोच्या प्रोमो व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
गुरुवारी, कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ‘बिग बॉस 17’ शोचा प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये नेहमीप्रमाणे अभिनेता सलमान खान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. प्रोमोमध्ये अभिनेता वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहे. कधी सलमान शर्ट-पॅंटमध्ये दिसतो, तर कधी अभिनेता टी-शर्टमध्ये समोर येतो. एका लूकमध्ये तर सलमान खान यांनी कुर्ता पायजामा आणि टोपी घातली आहे… अभिनेत्याचे वेग-वेगळे लूक चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
‘बिग बॉस 17’ शोचा प्रोमो व्हिडीओ
प्रोमो व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणतो, ‘अब तक आपने सिर्फ बिग बॉस की आंख देखी है. अब देखेंगे बिग बॉस के तीन अवतार. दिल…दिमाग ही दिमाग…और दम…’.. व्हिडीओ पोस्ट कॅप्शनमध्ये, ‘यावेळी बिग बॉस दाखवणार एक वेगळा रंग… ज्याला पाहून तुम्हीही व्हाल दंग…’ असं लिहिलं आहे. सध्या ‘बिग बॉस 17’ शोच्या प्रोमो व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
प्रोमो व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘बिग बॉस 17’ शोबद्दल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलील आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये काहीतरी वेगळं आणि हटके पाहायला मिळेल अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. एवढंच नाही तर, शो कधी सुरु होणार याबद्दल देखील चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. पण निर्मात्यांनी शो कधी सुरु होईल याबद्दल काहीही सांगितलं नाही.
‘बिग बॉस 16’ चा विजेता
‘बिग बॉस’ टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय शो आहे. चाहत्यांना देखील बिग बॉस हा शो प्रचंड आवडतो… गेल्या वर्षी म्हणजे ‘बिग बॉस 16’ शोचा विजेता प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन होता. तर शिव ठाकरे रनरअप ‘बिग बॉस 16’ चा ठरला होता. आता चाहत्यांच्या नजरा ‘बिग बॉस 17’ कडे आहे.