आई असून पोटच्या मुलाचा सौदा,अडीच कोटी अन् घराची मागणी; ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेत्रीवर पतीचे गंभीर आरोप

'बिग बॉस 18' मधून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक हेमा शर्माचे यक्तिगत आयुष्य जास्तच वादग्रस्त ठरत आहे. आई असून पोटच्या मुलाचा सौदा करत अडीच कोटी अन् घराची मागणी केल्याचा गंभीर आरोप हेमाचे पती गौरव सक्सेना यांनी केला आहे.

आई असून पोटच्या मुलाचा सौदा,अडीच कोटी अन् घराची मागणी; 'बिग बॉस 18'  फेम अभिनेत्रीवर पतीचे गंभीर आरोप
Hema Sharma,
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 6:40 PM

‘बिग बॉस हिंदी 18’ मध्ये असलेल्या किंवा बाहेर पडलेल्या प्रत्येक सदस्याचे खाजगी आयुष्य हे काहीना काही कारणाने चर्चेत आहेत. मग ते चांगल्या अर्थाने असो किंवा वाईट. तसंच काहीसं घडलं आहे हेमा शर्मा हिच्याबद्दल. हेमा शर्मा ही बिग बॉस हिंदी 18 मधून बाहेर पडलेली पहिली स्पर्धक होती. शोमधून बाहेर आल्यापासून या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य जास्तच वादग्रस्त ठरलं आहे.

एवढच नाही तर, ‘बिग बॉस’ च्या घरातून बाहेर पडल्यानंतर हेमाने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि दोन अयशस्वी विवाहांबद्दल उघडपणे भाष्य केलं. शिवाय हेमापासून वेगळे झालेले पती गौरव सक्सेना यांनी तिच्यावर गंभीर आरोपही केले. ही व्हायरल भाभी म्हणून ओळख असलेली ही अभिनेत्री . तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे आणि आताही आहे.

Hema Sharma

Hema Sharma,

पत्नीवर अडीच कोटी रुपये मागितल्याचा आरोप एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, हेमाचे पती गौरवने खुलासा करत म्हटलं की, हेमाने त्याला सांगितले होते जर त्याने तिला घर दिले तर ती त्याला मुलाचा ताबा लिखित स्वरुपात देईल. गौरव म्हणाला की, याचा अर्थ एक आई तिच्या मुलाचा अडीच कोटी रुपयांच्या बदल्यात त्याला मिळवून देण्याचा करार करत होती.

गौरव पुढे म्हणाला की, ‘बिग बॉस’मध्ये जाण्यासाठी हेमाने तिच्या अडीच वर्षांच्या मुलाचीही काळजी घेतली नाही’. त्यांनी हेमाला कलियुगी आई म्हटले. गौरवने पुढे खुलासा केला की. ‘त्याने हेमाचे यूट्यूब चॅनल युगांडामध्ये सुरु केले आहे. पण ती मुंबईला परतल्यावर सगळंच बदललं’.

Gaurav Saxena accuse Hema

Gaurav Saxena accuse Hema

वृद्धाश्रम चालवण्याची योजनाही सहानुभूतीसाठी

गौरवने पुढे सांगितले की, नोकरी सोडून अलीगढमध्ये वृद्धाश्रम चालवण्याची त्याची योजना होती. पण हेमाने स्पष्टपणे याला नकार दिला होता. फक्त व्हिडीओ बनवण्यासाठीच येणार असल्याचं तिने सांगितले. तेव्हा लोकांच्या सहानुभूतीसाठी वृद्धाश्रमाचा व्हिडीओ बनवू देणार नसल्याचं गौरवने हेमाला स्पष्ट सांगितलं. त्याच दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरु झाला.

जेव्हा गौरवला विचारण्यात आले की, हेमा मध्यरात्री घरुन निघून जाते आणि तिची कंपनी चांगली नाही असे तो का म्हणाला होता?. यावर गौरवने हेमाच्या मुलांवर नकारात्मक परिणाम होईल म्हणून त्याला याविषयी सविस्तर बोलणार नसल्याचे म्हटंले.

Gaurav Saxena accuse Hema

Gaurav Saxena accuse Hema

अभिनेत्रीने सर्व आरोप फेटाळून लावले हेमाला जेव्हा एका मुलाखती दरम्यान या सगळ्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तिने हे सगळे आरोप फेटाळून लावले. ती म्हणाली की,”त्या माणसाला हे पचवता येत नाही की, मी ज्या महिलेला सोडले ती ‘बिग बॉस’मध्ये पोहोचली आहे. त्याला फक्त प्रसिद्ध व्हायचे होते. त्याला सेलिब्रिटीचा नवरा म्हणून मिरवायचे होते. मी काम करावं अशी त्याची इच्छा होती. आणि तोपर्यंत माझ्या खर्चासाठी मला पैसे कमावणं भाग होतं याची मला जाणीव झाली होती”. अस म्हणतं हेमाने पतीवरच आरोप केले आहेत.

Non Stop LIVE Update
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.