Bigg Boss 18: फिनालेच्या शर्यतीतून आणखी एक स्पर्धक बाहेर; नाव ऐकून बसेल धक्का!

'बिग बॉस 18'चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर असताना आता घरातून आणखी एक स्पर्धक बाहेर पडला आहे. श्रुतिका आणि चाहत पांडेनंतर आता आणखी एका अभिनेत्रीला बिग बॉसचं घर सोडावं लागलं आहे.

Bigg Boss 18: फिनालेच्या शर्यतीतून आणखी एक स्पर्धक बाहेर; नाव ऐकून बसेल धक्का!
Bigg Boss 18 contestantsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 1:21 PM

कलर्स टीव्हीवरील ‘बिग बॉस 18’ या शोमध्ये सध्या फिनाले वीक सुरू आहे. तीन दिवसांनंतर 19 जानेवारी 2025 रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. फिनाले वीकदरम्यान आधी श्रुतिका आणि त्यानंतर चाहत पांडे यांना बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं होतं. त्यानंतर घरात सात स्पर्धक राहिले होते. यामध्ये विवियन डीसेना, करणवीर मेहरा, चुम दरांग, अविनाश मिश्रा, ईशा सिंह, रजत दलाल आणि शिल्पा शिरोडकर यांचा समावेश होता. मात्र फिनालेच्या तीन दिवस आधी आणखी एका स्पर्धकाला घरातून बाहेर जावं लागलं आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबूची मेहुणी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण शिल्पा शिरोडकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचं कळतंय.

बिग बॉसच्या फिनाले वीकमध्ये ओमंग कुमार आले होते. ओमंग कुमार गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉसचं घर वेगवेगळ्या थीमनुसार डिझाइन करतोय. या एपिसोडमध्ये ओमंग घरातील सदस्यांना पत्र आणून देतो. जवळच्या व्यक्तीने लिहिलेली ही पत्रे वाचून स्पर्धक भावूक होतात. त्यानंतर ओमंग शिल्पाला आणखी एक पत्र आणून देतात, ज्यामुळे ती स्पर्धेतून बाद झाल्याचं लिहिलेलं असतं. याविषयी अद्याप वाहिनीकडून कोणतीच अधिकृत घोषणा झाली नाही. शिल्पा शिरोडकर ही नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. अभिनेत्री नम्रता शिरोडकर तिची बहीण असून महेश बाबू तिचे भावोजी आहेत. या सिझनच्या पहिल्या एपिसोडपासूनच शिल्पा सोशल मीडियावर चर्चेत होती.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

शिल्पाच्या एलिमिनेशनंतर बिग बॉसच्या घरात फक्त सहा स्पर्धक राहिले आहेत. हा शो जिंकणाऱ्याला 50 लाख रुपये बक्षीस मिळणार असल्याचं कळतंय. मात्र ऐनवेळी सुटकेसची ऑफर मिळाल्यास ही बक्षिसाची रक्कम कमी होऊ शकते. करणवीर मेहरा आणि विवियन डीसेना हे दोन तगडे स्पर्धक असल्याचं मानलं जात आहे. या दोघांना रजत दलाल आणि अविनाश मिश्रा यांच्याकडून चांगली टक्कर मिळतेय. त्यामुळे यंदाच्या सिझनची ट्रॉफी कोण पटकावणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.