लग्नानंतर एकाच दिवसात अभिनेत्री हैराण; डिलिट केले लग्नाचे फोटो, सांगितलं कारण

बिग बॉसच्या आठव्या सिझनमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रेनी ध्यानी नुकतीच लग्नबंधनात अडकली. रेनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले. मात्र त्यानंतर असं काही घडलं, ज्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली आणि तिने लग्नाचे फोटोच डिलिट केले.

लग्नानंतर एकाच दिवसात अभिनेत्री हैराण; डिलिट केले लग्नाचे फोटो, सांगितलं कारण
Renee DhyaniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 4:23 PM

‘बिग बॉस’च्या आठव्या सिझनमध्ये भाग घेतलेली अभिनेत्री रेनी ध्यानी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रेनीने नुकतंच लग्न केलं आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. मात्र त्यानंतर तिच्यासोबत असं काही झालं, ज्यामुळे तिच्या मनात प्रचंड चिंता निर्माण झाली. अखेर रेनीने दुसऱ्याच दिवशी लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले. रेनी तिच्या लग्नात खुश नाही, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला. मात्र नंतर तिने खुद्द एक पोस्ट लिहून त्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

5 जुलै रोजी रेनी ध्यानीने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सांगितलं की तिने अरेंज मॅरेज केलं आहे. लग्नाचे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘अरेंज मॅरेजचं रुपांतर लव्ह मॅरेजमध्ये झालं, जेव्हा त्यांच्यातील दुरावा एका छोट्याशा हास्याने मिटलं गेलं.’ या फोटोंमध्ये रेनी तिच्या पतीसोबत अत्यंत सुंदर दिसत होती. तिने तिचा व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. ‘जेव्हा तुम्हाला कळतं की काही दिवसांतच तुम्ही तुमच्या पतीसोबत प्रत्येक गोष्टीबद्दल गप्पा मारताना दिसणार आहात’, असं तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. रेनीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र अचानक रेनी त्रस्त झाली आणि तिने लग्नाचे फोटोच डिलिट केले.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Renee Dhyani (@reneedhyanz)

रेनीने इन्स्टाग्रामवर आणखी एक पोस्ट लिहित यामागचं खरं कारण सांगितलं आहे. लग्नाच्या पोस्टनंतर सतत फोन कॉल्स आणि मेसेज येत असल्याने ती अस्वस्थ झाली होती. त्यामुळे तिने सर्व फोटो डिलिट केले. ‘गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करते. तुम्हा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मात्र योग्य वेळी योग्य पद्धतीने गुड न्यूज शेअर केली जाईल. इतके कॉल्स, इतके मेसेज पाहून मी अस्वस्थ झाले’, असं तिने लिहिलं.

रेनी ध्यानीला ‘एमटीव्ही रोडीज’ आणि ‘बिग बॉस 8’ या शोजमुळे प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती अनेक टीव्ही शोज आणि मालिकांमध्ये झळकली. यामध्ये चंद्रकांता, ये तेरी गलियाँ, आपकी नजरों ने समझा यांचा समावेश आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.