जास्मिन भसीनने गुपचूप उरकला साखरपुडा? ‘व्हॅलेंटाइन डे’ला पोस्ट केला अंगठीचा फोटो

बिग बॉसच्या घरात दोघांचा खुल्लमखुल्ला रोमान्स तर पहायला मिळालाच. मात्र घरातून बाहेर पडल्यानंतरही अनेकदा ही जोडी एकत्र दिसली. यादरम्यान आता जास्मिनने व्हॅलेंटाइन डेनिमित्त पोस्ट केलेल्या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

जास्मिन भसीनने गुपचूप उरकला साखरपुडा? 'व्हॅलेंटाइन डे'ला पोस्ट केला अंगठीचा फोटो
Jasmin BhasinImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 9:00 AM

मुंबई: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जास्मिन भसीन तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. जास्मिनला बिग बॉस 14 मुळे अधिकाधिक प्रसिद्धी मिळाली. याच शोमध्ये तिचं अभिनेता अली गोणीसोबत अफेअरची चर्चा रंगली. बिग बॉसच्या घरात दोघांचा खुल्लमखुल्ला रोमान्स तर पहायला मिळालाच. मात्र घरातून बाहेर पडल्यानंतरही अनेकदा ही जोडी एकत्र दिसली. यादरम्यान आता जास्मिनने व्हॅलेंटाइन डेनिमित्त पोस्ट केलेल्या फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये जास्मिन अंगठी दाखवत असल्याने तिने अलीसोबत साखरपुडा केला की काय, असा सवाल चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये जास्मिन डायमंडची सुंदर अंगठी फ्लाँट करता दिसतेय. त्यामुळे जास्मिनने गुपचूप साखरपुडा उरकल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘माझ्यासोबत घडलेली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट गोष्ट’ असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. मात्र जास्मिनच्या या फोटोमागील सत्य वेगळंच आहे.

हे सुद्धा वाचा

जास्मिन आणि अलीच्या साखरपुड्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण जास्मिनचा हा फोटो साखरपुड्याचा नाही तर एका अंगठीच्या ब्रँडचं प्रमोशन आहे. यावरून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

‘मला वाटतं तिचा साखरपुडा झाला’, असं एकाने लिहिलं. तर ‘आमच्या भावनांशी खेळू नकोस’ अशी कमेंट दुसऱ्या चाहत्याने केली आहे. ‘अली आणि जास्मिन यांची जोडी स्वर्गातून बनलेली आहे’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

पहा फोटो-

जास्मिन आणि अलीची भेट ही रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 9’ या शोमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावर हे दोघं एकमेकांविषयी खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात. नंतर बिग बॉसच्या घरातही या दोघांमधील खास बाँडींग पहायला मिळाली.

मध्यंतरीच्या काळात जास्मिन आणि अलीच्या लग्नाचीही चर्चा होती. माध्यमांनी तिला लग्नाबाबत प्रश्नही विचारला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “तुम्ही सगळे माझ्या लग्नाविषयी का बोलत आहात? आम्ही सध्या एकमेकांच्या प्रेमात आहोत. सध्या आमची लग्नाची किंवा इतर कोणतीही मोठी योजना नाही. आम्हाला, अजून एकमेकांना समजून घ्यायचं आहे. त्यानंतर आम्ही लग्नाबद्दल विचार करू.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.