‘बिग बॉस’मध्ये सर्वांसोबत नडणारी प्रियंका चाहर फिटनेस फ्रिक; खाते ‘हे’ पदार्थ
'बिग बॉस' स्पर्धक प्रियंका चाहर प्रमाणे फिट राहण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
Fitness Of Priyanka chahar : ‘बिग बॉस १६’ च्या घरातील भाडणं, खेळ, मैत्री सध्या चर्चेचा विषय आहे. घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्यात असलेल्या खास गोष्टीमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात सर्वांना नडणारी अभिनेत्री प्रियंका चहार तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र प्रियंकाच्या तिच्या परफेक्ट फिगरबद्दल चर्चेत आहे. महत्त्वाचं म्हणजे फिट राहण्यासाठी अभिनेत्री कायम आहार आणि वर्कआऊटवर पूर्ण लक्ष देते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आहाराबद्दल सांगितलं होतं.
‘बिग बॉस १६’ ची दमदार स्पर्धक प्रियंका तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. प्रियंका स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत करते. एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की, ती ब्रेकफास्ट पासून दुपारच्या जेवणापर्यंत फक्त लिक्विड आहार घेते. ब्रेकफास्टमध्ये अभिनेत्री बीट, केळी किंवा अन्य फळांचं ज्यूस पिते.
View this post on Instagram
दुपारचं जेवण करताना अभिनेत्री कोणत्याही प्रकारचं डाएट फॉलो करत नाह. अभिनेत्री दुपारी पोळी, भात, भाजी खाते. अभिनेत्रीला रात्री दह्यासोबत खिचडी खायला प्रचंड आवडते. प्रियंकाला जास्त गोड आवडत नाही. किंबहूना ती जास्त गोड खात देखील नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रियंका मैद्याने पदार्थ कायम टाळते.
View this post on Instagram
प्रियंकाला सकाळीच वर्कआऊट करायला आवडतं. प्रियंका म्हणजे फिटनेससाठी अनुशासित राहणं प्रचंड महत्त्वाचं आहे. प्रियंका प्रमाणेच इतर अभिनेत्री देखील फिटनेसला सर्वात जास्त महत्त्व देतात. एवढंच नाही, तर अभिनेत्री त्यांच्या जीमचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम पोस्ट करत असतात.
जीवनात फिटनेस प्रचंड महत्त्वाचं महत्त्वाचं आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येत सर्वसामान्य व्यक्तीचं फिटनेसकडे दुर्लक्ष होतं. तणाव आणि अती विचारामुळे आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून फिटनेस आजच्या काळात प्रचंड महत्त्वाचं आहे.