सूरज चव्हाण याने केला पॅडी कांबळे यांच्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, मी त्यांना…
Suraj Chavan and Paddy Kamble Bigg boss : 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले नुकताच झालाय. सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी 5 ची विजेता झालाय. प्रेक्षकांना सूरजची शैली सुरूवातीपासूनच आवडताना दिसली. विशेष म्हणजे सूरजने बिग बॉसच्या घरात धमाकेदार असा गेम देखील नक्कीच खेळलाय.
सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या घरातून विजेता म्हणून बाहेर पडलाय. सूरज आता एक फेमस चेहरा झालाय. सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरात दाखल होण्याच्या अगोदरपासूनच सूरज प्रसिद्ध आहे. बारामतीच्या एका छोट्याशा खेडेगावात सूरजचा जन्म झालाय. विशेष म्हणजे एका छोट्याशा गावातील तरूणाने बिग बॉस मराठीसारखा शो जिंकला आहे. लोक सूरज चव्हाण याचे काैतुक करताना दिसत आहेत. हेच नाही तर सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सूरजचीच हवा बघायला मिळतंय. अनेकांनी सूरज बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केल्या.
आता सूरज चव्हाण याने मोठा खुलासा केलाय. सूरज चव्हाण याने हा खुलासा पॅडी कांबळे यांच्याबद्दल केलाय. सूरज चव्हाण आणि पॅडी कांबळे यांच्यामध्ये ‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या घरात खास मैत्री ही बघायला मिळाली. हेच नाही तर पॅडी कांबळे यांनी सूरज चव्हाणला थेट आपला मुलगाच मानले. आयुष्यभर आपण सूरजची जबाबदारी घेणार असल्याचेही थेट पॅडी कांबळे यांनी म्हटले.
आता पॅडी कांबळे यांच्याबद्दल बोलताना सूरज चव्हाण हा म्हणाला की, मला बिग बॉसच्या घरात सर्वाधिक प्रेम पॅडीदादाचं मिळालं. मी घराला मिस करत आहे. ताई आणि दादा माझी बारामतीत वाट पाहत आहेत. ते हेलिकॉप्टर पाठवणार होते. हेलिकॉप्टरने मी जाणार आहे. त्यामुळे मला पॅडीदादाला भेटता येणार नाही. फोनवर आम्ही बोलणार आहोत. संपर्कात राहणार आहोत.
पुढे सूरज म्हणाला की, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ट्विट केल्याचं माहीत नव्हतं. पण ऐकून बरं वाटलं. सूरजने थेट खुलासा केला की, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याची आणि पॅडी कांबळेची भेट झाली नाहीये. पण फोनवर बोलणार असल्याचे सूरजकडून स्पष्ट करण्यात आले. बिग बॉसच्या घरात असतानाच सूरजची जबाबदारी आपण घेत असल्याचे पॅडी कांबळेने जाहीर केले होते.
पॅडी कांबळे हे सुरूवातीपासूनच सूरज चव्हाण याला बऱ्याच गोष्टी समजून सांगताना बिग बॉसच्या घरात दिसले. मात्र, पॅडी कांबळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अजिबातच सूरजला दु:ख झाले नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. हेच नाही तर आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडल्यानंतरही तो पॅडी कांबळेंना भेटला नसल्याने आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.