‘बिग बॉस मराठी’ची धमाकेदार सुरुवात; पहिल्याच दिवशी स्पर्धकांना होणार पश्चात्ताप?

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनचा दिमाखदार प्रीमियर नुकताच पार पडला. त्यानंतर आता पहिल्या एपिसोडची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

'बिग बॉस मराठी'ची धमाकेदार सुरुवात; पहिल्याच दिवशी स्पर्धकांना होणार पश्चात्ताप?
'बिग बॉस मराठी'Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 12:04 PM

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर रविवारी 28 जुलै रोजी पार पडला. या दिमाखदार प्रीमियरमध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुखने सर्व स्पर्धकांचं त्याच्या स्टाइलने स्वागत केलं. आता घरातील 16 सदस्य त्यांच्या स्टाइलने खेळ कसा रंगवणार आणि रितेश भाऊ कसा कल्ला करणार हे प्रेक्षकांना आजपासून पाहायला मिळेल. पहिल्याच एपिसोडपासून बिग बॉसचा खेळ चांगलाच रंगणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचं पहिल्याच दिवशी तोंडचं पाणी पळणार आहे. घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. स्पर्धक बिग बॉससमोर पाणी सोडण्यासाठी विनंती करत आहेत. पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत. पाणी मिळण्यासाठी काकुळतीने ‘बिग बॉस’ला ते विनंती करत आहेत. त्यावर बिग बॉस म्हणतात,”आता फक्त घरातलं पाणी गेलंय…थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल”. त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसलाय.

हे सुद्धा वाचा

बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या नव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण यांनी भाग घेतला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या घराचं दार अखेर उघडलं आहे. पण यंदा चक्रव्यूहामुळे सदस्यांना त्यांच्याप्रमाणे खेळता येणार आहे. सदस्यांचा खेळ पलटवून लावायला आणि त्यांना पेचात अडकवायला ‘बिग बॉस’ आणि रितेश भाऊ सज्ज आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड, बाथरुम, खाण्यापिण्याच्या सामानासाठी किंमत मोजावी लागणार आहे. बिग बॉस मराठी हा शो दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.