‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमध्ये काय असेल खास? रितेश देशमुख म्हणाला..

बिग बॉस मराठीचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच हा शो लाँच करण्यात आला. या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखने ग्रँड एण्ट्री केली. यंदाच्या सिझनचं सूत्रसंचालन रितेशच करणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सिझनमध्ये काय असेल खास? रितेश देशमुख म्हणाला..
रितेश देशमुखImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 8:26 AM

‘बिग बॉस मराठी’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित रिॲलिटी शोचं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसांतच या शोच्या नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. 100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या कलावंतांवर आपली नजर रोखायला सज्ज झाले आहेत. तर 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे. रितेश देशमुख आपल्या स्टाइलने हा खेळ रंगवणार आहे. या खेळात धमाल आहे, मस्ती आहे, मनोरंजनाचा राडा आहे, धुरळा आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन येत्या रविवारपासून दररोज रात्री 9 वाजता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या चक्रव्यूहात विविध क्षेत्रातील कमाल अतरंगी स्पर्धक सहभागी होणार आहेत. आता हे अतरंगी स्पर्धक कोण असतील? यंदाच्या सिझनची थीम काय असेल? अशा अनेक रहस्यांचा उलगडा लवकरच होणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या आतापर्यंत आलेल्या सर्व प्रोमोमध्ये रितेश देशमुखची ‘लयभारी’ स्टाइल पाहायला मिळाली. पण आता मात्र नवं पर्व सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता रितेश या सगळ्या पाहुण्यांचं कसं स्वागत करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळी जिओ सिनेमावर प्रेक्षकांना त्यांचे आवडते सेगमेंट चुगली बूथ, हाइप फीडमध्ये सहभागी होता येणार आहे. Hype Feed द्वारे चॅटिंग, रिॲक्टिंग, पोल्समध्ये सहभागी होता येईल. तसंच एलिमिनेशन व्होटिंगद्वारे मतदान करुन त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला वाचवता येईल.

हे सुद्धा वाचा

रितेश या सिझनमध्ये कुणाचा मित्र होणार तर कुणाचा गुरू होणार, कुणाबरोबर ग्रँड मस्ती करणार आणि कुणाबरोबर लयभारी दोस्ती करणार, कुणाचं काही चुकलं तर तो कानही उपटणार आणि कधी कुणाची पाठही थोपटणार आहे. रितेश भाऊचा हा अनोखा अंदाज पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आता उत्सुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाबद्दल रितेश देशमुख म्हणाला’, “बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनची खूप उत्सुकता आहे. अनेक वर्षांपासून मी हा शो फॉलो करतोय. आता ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट म्हणून ‘कलर्स मराठी’सोबत जोडला गेल्याचा मला आनंद आहे. ‘बिग बॉस मराठी’ला नव्या ढंगात, नव्या रुपात पोहोचवण्याची आमची जबाबदारी आहे. नव्या सिझनमध्ये राडा, धुरळा, मजा-मस्ती आणि लय भारी कल्ला होणार आहे.”

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाबद्दल कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले, “कलर्स मराठीचा सगळ्यात बिग तिकिट शो ‘बिग बॉस मराठी’ दोन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या शोसोबत कलर्स मराठीच्या प्रवासाचा नवा अध्याय सुरू होतोय, ज्यात कल्पकतेची उंच भरारी असेल. बॉलिवूडचा स्टायलिश स्टार आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश देशमुखवर या शोचा सूत्रसंचालक म्हणून आम्ही जबाबदारी सोपवली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन हटके असणार आहे. तो अधिक टवटवीत आणि तरूण असणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात जायला खूप हुशारी आणि हिंमत लागते. या सिझनमध्येही असेच जिगरबाज, हरहुन्नरी कलावंत आम्ही महाराष्ट्राच्या विभिन्न भागातून निवडले आहेत.”

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.