Bigg Boss Marathi Top Contestants: टॉप 6 स्पर्धाकांमुळे रंगला ‘बिग बॉस’ शो, कोण होणार विजेता? लिस्ट अखेर समोर

Bigg Boss Marathi Top Contestants: कोण असणार 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता? कोण मारणार मोठी बाजी? वोटींग लिस्ट अखेर समोर..., सर्व प्रेक्षकांच्या नजरा फक्त आणि फक्त 'बिग बॉस मराठी 5' फिनालेकडे...

Bigg Boss Marathi Top Contestants:  टॉप 6 स्पर्धाकांमुळे रंगला 'बिग बॉस' शो, कोण होणार विजेता? लिस्ट अखेर समोर
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 9:22 AM

Bigg Boss Marathi Top Contestants: काही तासांत ‘बिग बॉस 5’ शोच्या विजेत्याचं नाव घोषित होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांसोबतच त्यांच्या कुटुंबियांची आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात कोणता स्पर्धक ‘बिग बॉस 5’ शोची ट्रॉफी घरी घेऊन जाईल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त निक्की – अरबाज यांच्यातील कनेक्शन, सूरज झापूक झुपूक अंदाज, इतर स्पर्धकांचे वाद, अपमान आणि टास्कची चर्चा रंगली आहे. घरातील दमदार स्पर्धांमुळे टीआरपी लिस्टमध्ये देखील शो अव्वल स्थानी आहे. धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यामुळे ‘बिग बॉस’ शो रंगला.

सांगायचं झालं तर, शर्यतीत धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण आहेत. त्यामुळे 6 ऑक्टोबर रोजी कोण बाजी मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोण जिंकरणार अशी चर्चा सुरु असताना, सोशल मीडियावरचे वोटिंग ट्रेंड सध्या काय सांगतात याबाबत जाणून घेऊ.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वोटिंग लिस्टनुसार, पहिल्या स्थानी सूरज चव्हाण आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अंकिता, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर अभिजीत, धनंजय यांचा क्रमांक लागतो. वोटिंग लिस्टनुसार निक्की आणि जान्हवी शेवटी आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळी विजेता कोण असेल… स्पष्ट होईल.

टॉप 6 स्पर्धकांबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या स्थानी सूरज आहे. सोशल मीडियावर स्वतःच्या खास अंदाजात प्रसिद्धी झोतात आलेल्या ‘बिग बॉस’ च्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. एवढंच नाही, सूरज याने ‘बिग बॉस’च्या सर्वं दिलेले कामं उत्तम रित्या पार पाडली.

अभिजीत सावंत याच्याबद्दल सांगयचं झालं तर, गायक म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. ‘बिग बॉस’च्या घरात देखील अभिजीत उत्तम खेळी खेळला आणि शेवटच्या टप्प्यात पोहोचला. आता ‘बिग बॉस’ मुळे अभिजीत याच्या देखील प्रसिद्धी आणि लोकप्रितेत वाढ झाली आहे.

धनंजय पोवार याच्याबद्दल सांगायचं झालं तर, धनंजय हा प्रसिद्ध रीलस्टार आहे. घरी आई अन् बायकोचे आदेश पाळणारा धनंजय आता बिग बॉसचे आदेश ऐकत आहे. धनंजय सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. धनंजय याची पत्नी देखील सोशल मीडियावर सक्रिय असते.

निक्की आणि जान्हवी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघींनी देखील स्वतःच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं. जान्हवी प्रसिद्ध अभिनेत्री आह. जान्हवीने कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘सानिया’ हे खलनायिकेचे पात्र साकारले होते. त्यासोबतच ती ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतही झळकली.

निक्की सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीने तेलुगू आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाड़ी’ मध्ये देखील निक्की झळकली आहे. शिवाय अभिनेत्री अनेक म्यूझीक व्हिडीओमध्ये देखील काम केलं आहे.

चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.