Bigg Boss OTT 2 | घर विकलं, रेस्टॉरंट बंद पडलं; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला गेल्या 2 वर्षांपासूनचा संघर्ष

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत अविनाश घराघरात पोहोचला होता. मात्र आयुष्यातील चढउतारामुळे तो टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर झाला होता. सध्या 'बिग बॉस ओटीटी 2'मधील त्याच्या कामगिरीचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

Bigg Boss OTT 2 | घर विकलं, रेस्टॉरंट बंद पडलं; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला गेल्या 2 वर्षांपासूनचा संघर्ष
Avinash SachdevImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 11:35 AM

मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अविनाश सचदेवने नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अविनाशने बऱ्याच मुलाखती दिल्या होत्या. या मुलाखतींमध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याविषयी काही खुलासे केले होते. गेल्या दोन वर्षांपासूनचा काळ किती कठीण गेला, याविषयीही तो व्यक्त झाला. आर्थिक नुकसान झाल्यामुळे अविनाशला त्याचा फ्लॅटसुद्धा विकावा लागला आणि सध्या तो भाडेतत्त्वावर एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत आहे. “2019 मध्ये मी मुंबईत एक पॅन-आशियाई रेस्टॉरंट सुरू केलं होतं. अभिनयातील करिअरसोबतच मला स्वत:चा बिझनेस करायचा होता”, असं त्याने सांगितलं.

बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अविनाशने टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून दूर जाण्यामागचं कारणसुद्धा सांगितलं. तो म्हणाला, “2020 मध्ये कोरोना महामारी आली आणि काही महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर मला माझा रेस्टॉरंट बंद करावा लागला. मी कर्ज घेतलं होतं. ते फेडण्यासाठी माझ्यासमोर एकमेव पर्याय होता, तो म्हणजे फ्लॅट विकणं. आता मी भाडेतत्त्वावर एका अपार्टमेंटमध्ये राहतोय. गेल्या दोन वर्षांपासून मी बऱ्याच कठीण काळाचा सामना केला.” अविनाश सध्या बिग बॉस ओटीटीच्या घरात चांगली कामगिरी करताना दिसतोय.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे अविनाशसोबत त्याची एक्स गर्लफ्रेंड पलक पुरसवानीसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अविनाशने आतापर्यंत ‘मैं भी अर्धांगिनी’, ‘छोटी बहू’, ‘बालिका वधू’, ‘कुबूल है’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ : एक बार फिर’, ‘आयुष्मान भव’ आणि ‘करम अपना अपना’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पलक पुरसवानीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याने ‘नच बलिये 9’ या डान्स शोमध्येही भाग घेतला होता.

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत अविनाश घराघरात पोहोचला होता. मात्र आयुष्यातील चढउतारामुळे तो टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर झाला होता. सध्या ‘बिग बॉस ओटीटी 2’मधील त्याच्या कामगिरीचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. त्याच्या खेळीला नेटकऱ्यांकडून पसंती मिळतेय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.