Bigg Boss OTT 2 | “किसच्या मागे बिग बॉसचं मोठं षडयंत्र”; आकांक्षा पुरीने केली शोची पोलखोल

बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान जद हदिद आणि आकांक्षा पुरीने 30 सेकंदांसाठी लिप-टू-लिप किस केलं होतं. यावरून सोशल मीडियावर खूप मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये आकांक्षाचं नाव नॉमिनेट करण्यात आलं होतं.

Bigg Boss OTT 2 | किसच्या मागे बिग बॉसचं मोठं षडयंत्र; आकांक्षा पुरीने केली शोची पोलखोल
Akanksha PuriImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 1:08 PM

मुंबई : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मॉडेल आकांक्षा पुरी सध्या सोशल मीडियावर तिच्या किसिंग कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत आहे. घरातून बाद झाल्यानंतर तिने सूत्रसंचालक सलमान खानवर बरेच आरोप केले. त्याचप्रमाणे आता तिने जद हदिदसोबतच्या किस प्रकरणी वेगळाच खुलासा केला आहे. मंगळवारी संध्याकाळी सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्मवर लाइव्ह येत तिने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी तिने बिग बॉस आणि सलमानवर निशाणा साधला. बिग बॉसच्या घरात जे टास्क स्पर्धकांना दिले जायचे, त्यांना बाहेर वेगळ्याच पद्धतीने प्रस्तुत केलं जायचं, असा खुलासा आकांक्षाने केला.

बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान जद हदिद आणि आकांक्षा पुरीने 30 सेकंदांसाठी लिप-टू-लिप किस केलं होतं. यावरून सोशल मीडियावर खूप मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये आकांक्षाचं नाव नॉमिनेट करण्यात आलं होतं. आकांक्षाशिवाय अभिषेक मल्हान, जिया शंकर हेसुद्धा नॉमिनेट झाले होते. वीकेंड का वार एपिसोडमध्ये या तिघांना एक टास्क दिला गेला होता. या टास्कदरम्यान घराबाहेर कोणाला पाठवायचं हे त्यांना ठरवायचं होतं. त्यावेळी अभिषेक आणि आकांक्षाने जियाचं नाव घेतलं. तर जियाने आकांक्षाला घराबाहेर जाणाऱ्या स्पर्धकासाठी निवडलं. अखेर सूत्रसंचालक सलमान खानने घोषित केलं की बिग बॉसच्या घरातून आकांक्षा बाहेर पडणार.

या एलिमिनेशननंतर आकांक्षाने बिग बॉस या शोवर जोरदार टीका केली. “जेव्हा मी घराबाहेर आले तेव्हा जिओ सिनेमा ॲपवर पाहिलं की किसच्या सीनचा थंबनेल बनवला होता, त्याचा टीझर बनवला होता. त्या गोष्टीला अधिकाधिक प्रमोट केलं जात होतं. जर निर्मात्यांना हे सगळं करायचं होतं तर त्यांनी मला घराबाहेर का काढलं? बिग बॉस नेहमी प्रत्येक गोष्टीवर आम्हाला रोखायचे. हे करू नका, ते करू नका, इंग्रजीत बोलू नका, हिंदीत बोला. जर 30 सेकंदांच्या त्या किसची समस्या होती, तर त्याच वेळी आम्हाला का रोखलं नाही. मला अशी दुटप्पी भूमिका घेणारे लोक आवडत नाहीत”, अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान आकांक्षाला जेव्हा विचारलं गेलं की तू लग्न, किस आणि हुकअप करायचं असेल तर कोणाशी करशील? त्यावर ती म्हणाली की, “लग्न तर मला सलमान खानसोबत करायची इच्छा आहे. जदला मी किस केलं आहे, त्यामुळे अविनाशला मी किस करू शकेन आणि हुकअपसाठी जद ठीक आहे. त्याच्यासोबत मनाला वाटेल तितके हुकअप्स मी करू शकते. किस कॉन्ट्रोव्हर्सीचा मुद्दा सध्या खूप तापला आहे. सलमान तर यावरून खूप रागावला आहे. त्यामुळे त्याला मी किसच्या कॅटेगरीमध्ये टाकणार नाही. मी त्याला ऑनस्क्रीन किससुद्धा करू शकणार नाही.”

आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने.
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके.
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.