Bigg Boss OTT 2 मध्ये होणार मिया खलीफा हिची एन्ट्री! ॲडल्ट स्टारला मोठी ऑफर

Bigg Boss OTT 2 मध्ये मिया खलीफा हिची एन्ट्रीची चर्चा; सीझन 2 यशस्वी करण्यासाठी निर्मात्यांची जोरदार तयारी... ॲडल्ट स्टारला देण्यात आलीये मोठी ऑफर?

Bigg Boss OTT 2 मध्ये होणार मिया खलीफा हिची एन्ट्री! ॲडल्ट स्टारला मोठी ऑफर
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 9:58 AM

मुंबई | अभिनेता सलमान खान याचा बहुप्रतीक्षित शो ‘बिग बॉस ओटीटी २’ (Bigg Boss OTT 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शोची तारीख जशी जवळ येत आहे, त्याच प्रमाणे चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पहिल्या सीझनच्या होस्टची जबाबदारी दिग्दर्शक करण जोहर याच्यावर होती. पण आता सलमान खान शोच्या होस्टची भूमिका बजाबणार आहे. निर्मात्यांनी शोचं एंथम सॉन्ग आणि प्रोमो प्रदर्शित केला आहे. आता शोमध्ये कोणते स्पर्धक असतील याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. प्रत्येक आठवड्याला काही तरी नवी टास्कच्या माध्यमातून शो ऑल टाईम हिट बनवण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत.

शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडावा म्हणून ॲडल्ट स्टार मिया खलिफा, कॉमेडियन कुणाल कामरा, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा तसेच श्रीलंकन ​​गायक योहानी यांच्याशीही संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे मिया खलिफा हिची…

‘बिग बॉस ९’ ज्याप्रमाणे अभिनेत्री सनी लिओनी हिला ॲडल्ट इंडस्ट्रीमधून रिऍलिटी शोमध्ये आणलं होतं, त्याच प्रमाणे मिला खलिफा हिच्याबाबत होणार असल्याची चर्चा रंगत आहे. फक्त मिया खलिफा नाही तर, अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला देखील ‘बिग बॉस ओटीटी 2’ साठी ऑफर देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

राज कुंद्रा याचं पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज तीन महिने तुरुंगात होता. अशात जर तो शोमध्ये आला तर, राजला त्याच्यावर आलेला प्रसंग सांगण्यासाठी आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी संधी मिळेल अशी शक्यता निर्मात्यांकडून वर्तवण्यात आल्याची चर्चा रंगत आहे.

मिया खलिफा, राज कुंद्रा यांच्यासोबतच ‘बिग बॉस ओटीटी 2’ साठी दिग्‍गज पंजाबी गायक Daler Mehndi यांना देखील ऑफर देण्यात आली आहे. सध्या सर्वत्र ‘बिग बॉस ओटीटी 2’ची चर्चा सुरु आहे. आता ‘बिग बॉस ओटीटी 2’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच यशस्वी ठरतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘बिग बॉस ओटीटी 2’ शोची सुरुवार १७ जून पासून होणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’ प्रेक्षकांनी जियो सिनेमावर पाहता येणार आहे. यावेळी ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये जंगल थीम असणार आहे. पहिल्या सीझनची विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल होती. आता ‘बिग बॉस ओटीटी 2’ची ट्रॉफी कोण घरी घेवून जातं पाहणं मजेशीर असणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.