Bigg Boss OTT 2 | नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीवर भडकली पूजा भट्ट; घटस्फोटाबद्दल थेट म्हणाली..

आलिया सिद्दिकीने जेव्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता, तेव्हा तिने या गोष्टीची कबुली दिली होती की तिची ओळख 'स्टारची पत्नी' अशीच आहे. आलिया स्वत: निर्माती असली तरी नवाजुद्दीनसोबतच्या कौटुंबिक वादामुळेच ती सोशल मीडियावर चर्चेत राहिली.

Bigg Boss OTT 2 | नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीवर भडकली पूजा भट्ट; घटस्फोटाबद्दल थेट म्हणाली..
Pooja Bhatt and Aaliya SiddiquiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 1:02 PM

मुंबई : बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. पहिल्या एपिसोडपासून हा शो सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात अभिनेत्री पूजा भट्ट आणि अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकी यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पहायला मिळालं. घरातील एका टास्कदरम्यान पूजा आलियाला म्हणते, “तू विक्टिम कार्ड (स्वत: पीडित असल्याचं दाखवून सहानुभूती मिळवणं) खेळणं बंद कर.” बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही अनेकदा आलियाने नवाजुद्दीनसोबतच्या घटस्फोटाचा उल्लेख केला. मात्र केवळ घटस्फोटाच्या आधारावर प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस, असं पूजाने तिला खडसावलं.

याआधी सूत्रसंचालक सलमान खाननेही आलियाला तिच्या खासगी आयुष्यावरून फटकारलं होतं. सलमानने तिला बिग बॉसच्या घरात खासगी आयुष्याविषयी कमी बोलण्याचा सल्ला दिला होता. “आम्हाला तुझ्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात काडीमात्र रस नाही. जर तुम्ही असा विचार करत असाल की शोमध्ये येऊन खासगी आयुष्याबद्दल बोलून प्रसिद्धी मिळवू, तर असं होणार नाही. घराच्या आत आणि बाहेर तुम्ही आधीच बरंच काही बोलला आहात. सर्वांना मुलाखती देऊन तुम्ही तुमची बाजू स्पष्ट केली आहे”, असं तो तिला म्हणाला होता.

पूजाने आलियाला केलं नॉमिनेट

बिग बॉसच्या घरात जेव्हा स्पर्धकांना नॉमिनेट करण्यास सांगिण्यात आलं तेव्हा पूजाने आलियाचं नाव घेतलं. यावेळी सहस्पर्धकाला नॉमिनेट करण्यामागचं कारणसुद्धा बिग बॉसला सांगावं लागतं. पूजाने बिग बॉसला सांगितलं की तिने आलियाच्या स्वभावाची अशी बाजू पाहिली, जी तिला भीतीदायक वाटली. पूजा पुढे म्हणाली, “गेल्या आठवड्यात मी आलियाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल फार संभ्रमात होते. मी तिच्या मनातील विचार वाचू शकले नाही. गेल्या 24 तासांत मी तिची अशी बाजू पाहिली आहे, जी खूप भीतीदायक आहे. जिया शंकर, बेबिका धुर्वे हे एकमेकांशी भांडत राहतील. काल रात्री आलियाने त्यांच्यातील भांडणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला पण नंतर बेबिकाच्या वाढदिवसाच्या केकमधून तिनेच मोठा भाग उचलला. जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही किंवा त्या व्यक्तीचा तुम्ही तिरस्कार करता, तर मग अशा व्यक्तीच्या वाढदिवसाचा केक तुम्ही इतक्या आनंदाने कसं खाऊ शकता?”

हे सुद्धा वाचा

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीबद्दल काय म्हणाली पूजा?

आलियासमोर पूजा मोकळेपणे व्यक्त झाली आणि तिच्या स्वभावाबद्दल बोलू लागली. “या छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्तीचा स्वभाव कळतो आणि त्याचं व्यक्तिमत्त्व दिसून येतं. मोठमोठ्या गोष्टींमधून कळत नाही. आपण जे काम करतो त्यातून घडतो. पण जे काम करणार आहोत त्याविषयी बडबड करून मोठे होत नाही. मला तुला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की, लग्न माझंही तुटलं आहे, याआधीही बऱ्याच महिलांचा घटस्फोट झाला आहे. दुर्दैवाने भविष्यातही असंख्य महिला या दु:खातून जातील. पण विक्टिम कार्ड सतत खेळताना पाहून लोकं थकतात. माझ्या मते तू विक्टिम कार्ड खेळणं थांबवलं तर आयुष्यात खूप पुढे जाशील”, असा सल्ला तिने आलियाला दिला.

आलिया सिद्दिकीने जेव्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता, तेव्हा तिने या गोष्टीची कबुली दिली होती की तिची ओळख ‘स्टारची पत्नी’ अशीच आहे. आलिया स्वत: निर्माती असली तरी नवाजुद्दीनसोबतच्या कौटुंबिक वादामुळेच ती सोशल मीडियावर चर्चेत राहिली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.