Bigg Boss OTT 2 | “मी हा शो सोडून जातोय”; बिग बॉसच्या घरातील किसिंगवर भडकला सलमान खान

या प्रोमो व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'मला माहीत होतं की भाईजान रागावेल. जो माणूस त्याच्या चित्रपटात किसिंग सीन ठेवत नाही, हा तर फक्त रिॲलिटी शो आहे', असं एकाने लिहिलं. तर 'ड्रामा सुरू आहे. आकांक्षाला बाहेर काढा, तसंही ती काहीच करू शकत नाही', असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

Bigg Boss OTT 2 | मी हा शो सोडून जातोय; बिग बॉसच्या घरातील किसिंगवर भडकला सलमान खान
Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 1:19 PM

मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये जी गोष्ट घडणार असा प्रेक्षकांना अंदाज होता, अखेर तेच घडलं. या आठवड्यात शोमध्ये जद हदिद आणि आकांक्षा पुरी यांच्या किसची जोरदार चर्चा झाली. एका टास्कदरम्यान दोघं 30 सेकंदांपर्यंत लिप-टू-लिप किस करत होते. या घटनेवर आता सूत्रसंचालक सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉस ओटीटीचा कंटेंट हा कौटुंबिक असण्यावर अधिक भर असेल, असं सलमानने शो सुरू होण्याआधी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. मात्र टीव्हीप्रमाणे ओटीटीला कोणताच सेन्सॉरशिप नसतो, या गोष्टीचा फायदा पुरेपूर या शोने घेतला. हीच गोष्ट सलमानला आवडली नाही. सोशल मीडियावर या शोच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये भडकलेला सलमान थेट शो सोडण्याबद्दल बोलताना दिसतोय.

स्पर्धकांना सलमानचा इशारा

‘बिग बॉस ओटीटी 2’च्या ‘वीकेंड का वार’ या एपिसोडचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सलमान स्पर्धकांवर खूप नाराज असल्याचं दिसून येत आहे. तो म्हणतो, “तुम्हाला असं वाटतंय की हा या आठवड्यातला हायलाइट होता. संगोपन, कुटुंब, नैतिकता, तो टास्क तुमच्या सभ्यतेविषयी होता का? तुम्ही जे केलंत त्यासाठी माझी माफी मागण्याची गरज नाही. मला काहीच फरक पडत नाही. मी इथून निघून जातोय. मी हा शो सोडतोय.”

हे सुद्धा वाचा

स्पर्धकांना बसला धक्का

यानंतर सलमान स्टेजवरून जाताना दिसतो. तो खरंच शो सोडतोय का असा प्रश्न स्पर्धकांना पडतो. त्याविषयीचा खुलासा आता वीकेंड का वार या खास एपिसोडमध्येच होईल. या प्रोमो व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘मला माहीत होतं की भाईजान रागावेल. जो माणूस त्याच्या चित्रपटात किसिंग सीन ठेवत नाही, हा तर फक्त रिॲलिटी शो आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘ड्रामा सुरू आहे. आकांक्षाला बाहेर काढा, तसंही ती काहीच करू शकत नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.

बिग बॉसच्या घरात अब्दु रोझिकची एण्ट्री

बिग बॉसच्या घरात गायक अब्दु रोझिकचीही एण्ट्री पहायला मिळाली. अब्दुची एण्ट्री होताच घरातील स्पर्धक त्याचं जोरदार स्वागत करतात. बिग बॉसच्या मागच्या सिझनमध्ये अब्दुने भाग घेतला होता. त्याच्या क्युटनेसने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.