Elvish Yadav | एल्विश यादवने दुबईत तब्बल इतक्या कोटींना घेतलं आलिशान घर; पहा खास झलक

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनच्या विजेत्याने दुबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. एल्विश यादवने त्याच्या व्लॉगद्वार या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्याने हे यश संपादित केलं आहे.

Elvish Yadav | एल्विश यादवने दुबईत तब्बल इतक्या कोटींना घेतलं आलिशान घर; पहा खास झलक
Elvish YadavImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 4:00 PM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’च्या दुसऱ्या सिझनमध्ये युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचाच दबदबा पाहायला मिळाला. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवने या सिझनचं विजेतेपद आपल्या नावे केलं. ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा रिअॅलिटी शो जिंकल्यापासून एल्विशच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. म्युझिक व्हिडिओपासून ते चित्रपटांपर्यंत त्याला असंख्य ऑफर्स येत आहेत. नुकताच त्याने अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत एक म्युझिक व्हिडिओ शूट केला. त्यानंतर आता एल्विशने दुबईमध्ये स्वत:चं आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराची झलक त्याने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना दाखवली.

एल्विश यादवने त्याच्या 26 व्या वाढदिवसाच्या आधी एक नवीन व्लॉग शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्याने दुबईतील घर दाकवलं आहे. एल्विशने दुबईमध्ये हक्काचं घर खरेदी केलं असून या घराची किंमत तब्बल आठ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र एल्विशने याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. व्लॉगमध्ये एल्विशच्या घरातील प्रत्येक कोपरा दाखवण्यात आला आहे. दुबईमधलं त्याचं घर अत्यंत सुंदर आणि आलिशान असल्याचं पाहायला मिळत आहे.

एल्विश त्याचा 26 वा वाढदिवस साजरा करत असून त्यानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या खास दिनानिमित्त उर्वशी रौतेलासोबतचा त्याचा म्युझिक व्हिडिओसुद्धा लाँच करण्यात आला आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये दोघांची जोडी खूप चांगली दिसतेय, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून उर्वशी आणि एल्विश या गाण्याचं प्रमोशन करत होते.

हे सुद्धा वाचा

वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेणारा एल्विश जवळपास 50 दिवसांपेक्षा अधिक काळ तिथे टिकून राहिला. याआधी वाइल्ड कार्डद्वारे आलेला कोणताच स्पर्धक विजेता ठरला नव्हता. एल्विशने प्रसिद्ध युट्यूबर अभिषेक मल्हान, अभिनेत्री पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे यांना हरवलं. बिग बॉसची ट्रॉफी आणि 25 लाखांचं रोख बक्षीस त्याने आपल्या नावे केलं.

एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान या दोघांमध्ये ‘कांटे की कट्टर’ होती. त्यांना मिळालेल्या मतांमध्ये फार कमी फरक होता. एल्विश यादवला फिनालेमध्ये 54 टक्के मतं मिळाली तर अभिषेकला 46 टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच फक्त आठ टक्क्यांच्या फरकाने एल्विश हा शो जिंकला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी तगडी स्पर्धा पहायला मिळाली. जिथे मतांमध्ये फक्त आठ टक्क्यांचा फरक होता.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.