Bigg Boss OTT 2 | एल्विश यादवकडून अखेर गर्लफ्रेंडविषयी खुलासा; पंजाबमधल्या मुलीला करतोय डेट

जवळपास 30 मिनिटांच्या लाइव्ह चॅटदरम्यान जेव्हा मनु पंजाबीने एल्विशला त्याच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारला, तेव्हा तो म्हणाला, "ज्या मुलीची चर्चा होतेय, ती वेगळी आहे. ती सोशल मीडियावर नाही. ती पंजाबची आहे आणि पंजाबमध्येच राहते."

Bigg Boss OTT 2 | एल्विश यादवकडून अखेर गर्लफ्रेंडविषयी खुलासा; पंजाबमधल्या मुलीला करतोय डेट
Elvish Yadav Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 9:04 AM

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचं शाही थाटात स्वागत करण्यात आलं होतं. एल्विशबद्दल जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता पहिल्यांदात त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा खुलासा केला आहे. बिग बॉसच्या घरात असताना मनीषा राणीने अनेकदा एल्विशसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा एल्विशने तिला स्पष्ट केलं होतं की त्याच्या आयुष्यात एक मुलगी आहे आणि बिग बॉसच्या घरात त्याला कोणतीच लव्ह स्टोरी नको आहे. आता पहिल्यांदाच तो त्याच्या गर्लफ्रेंडविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे.

शो जिंकल्यानंतर आधी एल्विशने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी मस्करी केल्याचं म्हटलं होतं. गर्लफ्रेंडबाबत खोटं बोलल्याचं तो म्हणाला होता. मात्र आता त्याने सीरिअस रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबूल केलं आहे. ‘बिग बॉस 10’चा स्पर्धक मनु पंजाबीशी लाइव्ह चॅटदरम्यान एल्विशने त्याच्या गर्लफ्रेंडविषयी खुलासा केला आणि सांगितलं की तो तिच्यासोबत सीरिअस रिलेशनशिपमध्ये आहे. एल्विशने हेसुद्धा स्पष्ट केलं की त्याची गर्लफ्रेंड पंजाबची आहे. तिला तिचं रिलेशनशिप खासगी ठेवायला आवडत असल्याने तिच्या नावाचा खुलासा करत नसल्याचं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जवळपास 30 मिनिटांच्या लाइव्ह चॅटदरम्यान जेव्हा मनु पंजाबीने एल्विशला त्याच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारला, तेव्हा तो म्हणाला, “ज्या मुलीची चर्चा होतेय, ती वेगळी आहे. ती सोशल मीडियावर नाही. ती पंजाबची आहे आणि पंजाबमध्येच राहते. पंजाब सोडून ती कुठेच गेली नाही. तिचं आयुष्य खूपच खासगी आहे आणि ते तसंच राहावं अशी तिची इच्छा आहे. मी तिचं नाव जाहीरपणे घ्यावं अशी तिची इच्छा नाही. ती या सर्व गोष्टींपासून दूर आहे आणि खुश आहे.” शोदरम्यान क्रिती मेहरा नावाच्या एका मुलीने एल्विशची गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला होता. मात्र मनु पंजाबीसोबतच्या लाइव्ह चॅटदरम्यान एल्विशने तिचा हा दावा फेटाळला. ती माझी गर्लफ्रेंड नाही, असं त्याने स्पष्ट केलं.

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...