वडापाव गर्लचा अनिल कपूर यांनी घेतला क्लास, थेट म्हणाले, तू तुझे…
बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाका होताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात मोठे हंगामे होत आहेत. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांचे प्रेम मिळतानाही दिसत आहे. आता नुकताच बिग बॉसच्या घरात विकेंडचा वार झालाय. यावेळी अनिल कपूर यांनी घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेतल्याचे बघायला मिळतंय.
बिग बॉस ओटीटी 3 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच चर्चेत आल्याचे देखील बघायला मिळतंय. अनेक स्पर्धेक चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. अनिल कपूर हे बिग बॉसला होस्ट करत आहेत. आता नुकताच बिग बॉसमध्ये विकेंडचा वार पार पडलाय. यावेळी अनिल कपूर यांनी घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावल्याचे बघायला मिळतंय. सना हिच्यानंतर अनिल कपूर यांनी आपला मोर्चा हा चंद्रिका दीक्षित अर्थात वडापाव गर्लकडे वळवला. अनिल कपूर हे चंद्रिका दीक्षित हिला खडेबोल सुनावताना दिसले.
चंद्रिका दीक्षित हिला अनिल कपूर हे म्हणाले की, चंद्रिका दीक्षितकडे एकही मुद्दा नसल्याने ती सतत विशाल पांडे याच्या मुद्दावर बोलताना दिसली. हेच नाहीतर तिने हा विषय वाढवण्याचाही प्रयत्न केला. चंद्रिका दीक्षितकडे मुद्दा नसल्याने ती दुसऱ्यांच्या मुद्दामध्ये घुसते आणि विक्टिम कार्ड खेळते. तुला विशालला नॉमिनेशनमध्ये टाकण्यासाठी तुझा मुद्दा नव्हता.
विशालचा विषय जास्त मोठा होता. अनिल कपूर यांचे हे बोलणे ऐकून चंद्रिका दीक्षित ही ढसाढसा रडताना दिसली. चंद्रिका दीक्षित ही सतत रडताना दिसत आहे. बाकी घरातील सदस्यांनी म्हटले की, चंद्रिका दीक्षित ही गेमसाठी तिच्या घरातील मित्रांनी धोका देते. घरातील अनेक सदस्य तिच्या विरोधात बोलताना देखील दिसले.
चंद्रिका दीक्षित हिच्याबद्दल बोलताना शिवानी ही म्हणाली की, चंद्रिका दीक्षित मला छोटी बहिण मानते. मात्र, तरीही तिने मला नॉमिनेशनमध्ये टाकले. मुळात म्हणजे चंद्रिका दीक्षित ही काही दिवसांपूर्वीच शिवानी हिला समजून सांगताना दिसली की, तू विशाल पांडे याच्यासोबत इतके सर्व होऊनही कसे सोबत राहू शकते?
तुला वाटते का विशाल पांडे याने जे काही केले ते योग्य होते. यावर शिवानी ही म्हणाली की, नक्कीच विशाल पांडे याने केले ते योग्य नाही पण तो माझा मित्र आहे, त्याला एकटे कसे सोडणार. विशाल पांडे याने अरमान मलिक याच्या पत्नीबद्दल केलेल्या विधानानंतर घरातील सदस्य हे त्याच्यावर नाराज दिसले. हेच नाहीतर जास्त करून लोकांनी विशाल पांडे याला बोलणे देखील सोडले होते.