Bigg Boss OTT 3: पायल घरातून बाहेर होताच अरमानने मारली दुसऱ्या पत्नीला मिठी; म्हणाला, ‘मी आनंदी…’

Bigg Boss OTT 3: पायल 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर होताच कृतिका रडू लागली तर, अरमान झाला आनंदी... दुसऱ्या पत्नीला मिठी मारत युट्यूबर म्हणाला..., 'बिग बॉस ओटीटी 3' मुळे अरमान, पायल आणि कृतिका यांच्या नात्याचं सत्य आलं सर्वांसमोर...

Bigg Boss OTT 3: पायल  घरातून बाहेर होताच अरमानने मारली दुसऱ्या पत्नीला मिठी; म्हणाला, 'मी आनंदी...'
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 9:30 AM

‘बिग बॉस ओटीटी 3’ शोची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. कारण यंदाच्या सिझनमध्ये अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सोशल मीडिया स्टार शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. त्यापैकी तीन जण म्हणजे युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी.. पण आता अरमान याची पहिली पत्नी पायल मलिक ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर झाली आहे. शोच्या पहिल्या ‘विक एन्ड का वार’मध्ये अभिनेता आणि शोचा होस्ट अनिल कपूर यांनी पायल मलिक हिला एलिमिनेट केलं आहे. अनिल कपूर यांनी मिळालेल्या मतांच्या आधारावर पायल हिला घरातून बाहेर केलं आहे.

पायल घरातून बाहेर होतात कृतिका रडू लागली तर, अरमान आनंदी झाली. पायलच्या नावाची घोषणा होताच कृतिका रडू लागते तर, ‘मी आनंदी आहे…’ असं म्हणत अरमान याने आनंदाचं कारण देखील सांगितलं. सध्या सर्वत्र अरमान, पायल आणि कृतिका यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

अनिल कपूर यांनी पायल हिच्या नावाची घोषणा करण्याआधी अरमान याला विचारलं, ‘जर आज पायल एलिमिनेट झाली तर काय होईल?’ यावर अरमान म्हणाला, ‘काही नाही सर…. मी दोन्ही गोष्टींसाठी तयार आहे. पायल जर बाहेर जाणार असेल तर, चांगली गोष्ट आहे. कारण चार मुलांकडे जाईल त्यांचा सांभाळ करेल… जर ती याठिकाणी राहाणार असेल तर, तिने असं कोणतं काम केलं नाही ज्यामुळे ती घरातून बाहेर जाईल…’

अरमान मलिक याचं मत जाणून घेतल्यानंतर अनिल कपूर यांनी पायल हिची घोषणा केली. त्यानंतर पायल हिला घराबाहेर सोडण्यासाठी कृतिका आली आणि म्हणाली, ‘मला माहिती आहे तू बाहेर सर्व काही सांभाळून घेशील. आम्ही देखील लवकरच बाहेर येऊ..’ यावर पायल म्हणते, ‘लवकर नका येऊ… शेवटपर्यंत खेळा.’

पायल घराबाहेर गेल्यानंतर अरमान याने दुसरी पत्नी कृतिका हिला मिठी मारली आणि म्हणाला, ‘तिंघांपैकी दोघे आत आणि एक बाहेर असे तरी काहीही हरकत नाही… तुम्ही अनुभव तर घेतला की खेळ किती कठीण आहे. ती याठिकाणी असायला हवी होती अशी माझी इच्छा होती. पण पायल घरी गेली यासाठी देखील मी आनंदी आहे…’ असं देखील अरमान म्हणाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.