माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठं स्कँडल; ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्याचा खुलासा

रणवीरने आतापर्यंत ‘खोसला का घोसला’, ‘एक था टायगर’, ‘टायगर 3’, ‘कडवी हवा’, ‘भेजा फ्राय’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. एकेकाळी तो महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टला डेट करत होता. बिग बॉसच्या घरात तो त्याच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी व्यक्त झाला.

माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठं स्कँडल; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्याचा खुलासा
अभिनेता रणवीर शौरी आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 10:59 AM

‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेता रणवीर शौरी स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. या शोमध्ये पहिल्या दिवसापासून त्याची सतत भांडणं होत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये रणवीर त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने अभिनेत्री पूजा भट्टसोबतच्या नात्याविषयी मौन सोडलं. एकेकाळी रणवीर आणि पूजा एकमेकांना डेट करत होते. मात्र ब्रेकअपनंतर तिने रणवीरवर नशेत मारहाण केल्याचा आरोप केला होता. अवघ्या काही महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. 2000 च्या सुरुवातीला रणवीर आणि पूजाचं नातं चर्चेत होतं.

‘बिग बॉस ओटीटी 3’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये रणवीरने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाच्या आठवणींना उजाळा दिला. “लडाखमध्ये ‘लक्ष्य’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आईची तब्येत बिघडली होती. मला त्याविषयी माहिती मिळाली होती, पण शूटिंगमुळे मी आईला भेटायला जाऊ शकलो नाही. जेव्हा मी शूटिंगवरून परतलो, तेव्हा ती रुग्णालयातून घरी परतली होती. मात्र त्याच्या काही दिवसांतच तिचं निधन झालं होतं. त्याचवेळी माझ्यासोबत एका अभिनेत्रीशी संबंधित स्कँडल झाला होता. मी त्या गोष्टीतून बाहेर पडू शकत नव्हतो,” असं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

याविषयी तो पुढे म्हणाला, “माझ्या भावाने मला त्याच्याकडे अमेरिकेत बोलावलं होतं. मी त्याच्याकडून उधारीने पैसे घेऊन अभिनयाचा कोर्स केला होता. तिथून परतल्यानंतर 2005 मध्ये मी ‘द ग्रेट इंडियन कॉमेडी शो’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. त्याचवेळी माझे दोन चित्रपट रखडले होते आणि एका आठवड्यात बॅक-टू-बॅक दोन्ही हिट ठरले. माझ्या कामाला प्रेक्षकांकडून प्रेम मिळू लागलं आणि तिथूनच मी हळूहळू पुढे आलो.”

हे सर्व सांगताना रणवीरने पूजा भट्टचं नाव घेतलं नाही. मात्र पूजा ही तिच अभिनेत्री आहे, तिच्यासोबत रणवीरचं स्कँडल चर्चेत होतं. 2000 मध्ये पूजा भट्टने रणवीरवर दारूच्या नशेत मारहाणीचा आरोप केला होता. तेव्हा त्याने हे आरोप फेटाळले होते. “इतर जोडप्यांप्रमाणेच माझंही पूजासोबत काही मुद्द्यांवर पटत नव्हतं. पण मी तिला कधीच मारहाण केली नव्हती”, असं त्याने स्पष्ट केलं होतं. पूजा आणि रणवीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र भांडणांनंतर पूजाने घर सोडलं होतं.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.