Bigg Boss OTT 3: पहिल्या पत्नीसोबत होणार अरमानचा घटस्फोट? पायल म्हणाली, ‘माझ्याकडे बक्कळ पैसा आहे म्हणून…’
Bigg Boss OTT 3: 'माझ्याकडे बक्कळ पैसा आहे म्हणून...', स्वतःच्या मुलांना घेऊन पायल मलिक होणार वेगळी, पायल - अरमान यांचा होणार घटस्फोट? 'बिग बॉस'मध्ये आल्यामुळे अरमान, पायल आणि कृतिका यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्ट समोर...
युट्यूबर पायल मलिक आता ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोमधून बाहेर आली आहे. पहिल्याच आठवड्यात पायल हिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपला आहे. सध्या पायल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पायल हिचा पती युट्यूबर अरमान मलिक याने पायल हिला घटस्फोट न देता कृतिका हिच्यासोबत लग्न केलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे पायल आणि कृतिका एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे अरमान – कृतिका यांच्यामध्ये देखील चांगली मैत्री झाली. पण जेव्हा अरमान – कृतिका यांनी लग्न केलं तेव्हा पायल हिला मोठा धक्का बसला. अशात चाहत्यांमध्ये पायल आता अरमानला घटस्फोट देणार का? अनेकांनी तर पायल हिने आता विभक्त व्हायला हवं… असा देखील सल्ला तिला दिला.
पायल हिने अरमानला घटस्फोट देत स्वतःची भक्कम ओळख तयार करण्याची गरज आहे. पायल हिने मुलांसोबत व्लॉगिंगच्या विश्वात पाऊल ठेवायला हवं असं देखील अनेक जण बोलत आहेत. सांगायचं झालं तर, पायल हिला याबद्दल विचारण्यात देखील आलं. यावर पायल म्हणाली, ‘मी कधीच अरमानला घटस्फोट देणार नाही…’ तिने यामागचं कारण देखील सांगितलं.
पायल म्हणाली, ‘घटस्फोट कधीच होणार नाही कारण मला नाही वाटतं की अरमान कधी माझ्यात आणि कृतिकामध्ये फरक करतो. किंवा माझ्यावर जास्त आणि कृतिकावर कमी प्रेम करतो. अरमानसाठी आम्ही दोघी आणि आमची चार मुलं समान आहेत. माझ्या डोक्यात देखील कधी घटस्फोटाचे विचार येणार नाहीत. मला कितीही प्रसिद्धी मिळाली… माझ्याकडे बक्कळ पैसा आली तरी देखील मी विभक्त होणार नाही.’
‘मला माहिती आहे की, मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. माझ्याकडे आज इतका पैसा आहे की, मी वेगळी निघाली तरी, पैसा कमावू शकते. पण मला त्या दिशेना जायच नाही. मी माझ्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत आनंदी आहे. मी अरमानवर खूप प्रेम करते…’ एवढंच नाही तर, ‘बिग बॉस’ने पुन्हा बोलावलं जाईल… असं देखील पायल म्हणाली.
पायल मलिक हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पायल कायम सोशल मीडियावर स्वतःचे आणि कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील पायल हिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.