Bigg Boss 14 | रुबिना दिलैक पाठोपाठ कविता कौशिकचा ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप!

शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणारी कविता कौशिक हीने देखील आता बिग बॉस भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. ‘बिग बॉस 14’मध्येच रुबिना दिलैक वारंवार बिग बॉस भेदभाव करत असल्याचे म्हणत आहे.

Bigg Boss 14 | रुबिना दिलैक पाठोपाठ कविता कौशिकचा ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप!
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 2:30 PM

मुंबई : ‘बिग बॉस’चे 14वे (Bigg Boss) पर्व आता रंगात आले आहे. मध्यंतरी भलत्याच वादामुळे बिग बॉस चर्चेत आले होते. तर आता बिग बॉसमध्ये भेदभाव केला जात असल्याचे आरोप वारंवार केले जात आहेत. शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणारी कविता कौशिक हीने देखील आता बिग बॉस भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. ‘बिग बॉस 14’मध्येच रुबिना दिलैक वारंवार बिग बॉस भेदभाव करत असल्याचे म्हणत आहे. आता यात कविता कौशिकने ही उडी मारली आहे. (Bigg Boss Season 14 Kavita Kaushik Angry On Bigg Boss)

कविता कौशिक संपूर्ण भागात नाराज दिसली. भागाच्या सुरूवातीलाच बेजबाबदार असल्याचा ठप्पा तिच्यावर घरातील सहा जणांनी ठेवला. घरामध्ये आल्या-आल्याच तिचे एजाज खानसोबत झालेले भांडण, त्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. कविता कौशिक म्हणते की, मी एजाज खानची अनेक वेळा मदत केली, त्यांच्यासोबत मस्करी केली. पण, बिग बॉसने ते सर्व काही दाखवले नाहीतर, फक्त मी त्याच्याशी केलेले भांडणच दाखवले. माझ्या चांगला गोष्टी बिग बॉस दाखवत नाहीत, किंवा त्यावर चर्चा करत नाहीत. माझ्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्याच दाखवल्या जातात. माझी चांगली बाजूच दाखवलीच जात नाही. बिग बॉस निक्की तंबोली, पवित्रा आणि इजाज खान यांनाच चांगले दाखवतात. ते घरात चुकीचे वागतात, यावर चर्चा कधीच केली जात नाही. शेवटी कविता म्हणते की, मला या घरात राहयचेच नाही, मला माझ्या घरी जायचे आहे. कविता कौशिक, रुबिना दिलैक, निशांत मलकानी आणि जास्मीन भसीन हे रेड झोनमध्ये आहेत. यापैकी एकजण लवकरच बेघर होणार आहे. यापूर्वी रुबिना दिलैक हिने बिग बॉस भेदभाव करत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे रुबिना दिलैकने दुसऱ्यांदा हा आरोप केला आहे. बिग बॉस सीझन 13’मध्ये रश्मी देसाई आणि असिम रियाझ यांनी अशाच प्रकारचा आरोप केला होता. आता 14व्या पर्वामध्येही बिग बॉसवर भेदभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिग बॉस 14 ची स्पर्धक रुबिना दिलैक ही सध्या खूपच चर्चेत आहे. पुन्हा एकदा तिने बिग बॉसवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. शेवटच्या एपिसोडमध्ये रुबिना दिलैकने बिग बॉसवर भेदभाव करण्याचा आरोप केला होता. यापूर्वी सलमान खान आणि बिग बॉसविरोधात भेदभाव करत असल्याचा आरोप करत रुबिना दिलैकने बंड पुकारला होता.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 14 | ‘वीकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खानकडून स्पर्धकांची शाळा!

Bigg Boss | ‘बिग बॉस’कडून भेदभाव, रुबिना दिलैकचे गंभीर आरोप!

Bigg Boss 14 | घरात एकच व्यक्ती ‘टार्गेट’ होतेय, रुबिना दिलैकच्या चाहत्यांची तीव्र नाराजी

(Bigg Boss Season 14 Kavita Kaushik Angry On Bigg Boss)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....