Salman Khan ची ‘ही’ अभिनेत्री लवकरच होणार आई; सिनेविश्वाचा त्याग करत घेतला मोठा निर्णय

सलमान खान याची 'ही' अभिनेत्री लग्नाच्या अडीच वर्षांनंतर होणार आई; लग्नाआधी मोठा निर्णय घेत अभिनेत्रीने चाहत्यांना दिला धक्का.. आता अभिनेत्रीच्या आयुष्यात लवकरच होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री

Salman Khan ची 'ही' अभिनेत्री लवकरच होणार आई; सिनेविश्वाचा त्याग करत घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 9:57 AM

मुंबई : आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी अभिनेता सलमान खान याच्यासोबत काम केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आल्या. सलमानच्या बिग बॉस या शोमध्ये झळकल्यानंतर देखील अभिनेत्रींच्या नावाची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सना खान. बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर सना अनेक सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारताना दिसली. पण बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर चढत असताना सनाने एक मोठा निर्णय घेत, चाहत्यांना मोठा धक्का दिला. धर्माचा मार्ग अवलंबत मनोरंजन विश्वाला ‘अलविदा’ म्हटल्यानंतर सना हिने मौलवी मुफ्ती अनस सैय्यद (Mufti Anas) याच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या अडीच वर्षांनंतर सना आई होणार असल्याची चर्चा रंगत आहे.

सना खान आणि पती मुफ्ती अनस सैय्यद यांनी त्यांच्या आयुष्यातील आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सध्या सर्वत्र सना खान हिची चर्चा आहे. सना प्रेग्नेंट आहे. एका टीव्ही चॅनेलवर सना खान आणि पती मुफ्ती अनस सैय्यद यांनी ही आनंदाची बातमी सांगितली आहे. काही दिवसांपूर्वी सना हिने एक फोटो पोस्ट करत लवकरच एक ‘गुडन्यूज’ देणार असल्याची हिंट दिली होती.

आता सना खान लवकरच आई होणार असल्याची माहिती मिळत आहे. सना खान आणि पती मुफ्ती अनस सैय्यद याच वर्षी आई – वडील होणार आहेत. सना तीन महिन्यांनंतर तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याची माहिती मिळत आहे. सनाने आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यामुळे चाहते अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सनाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘बिग बॉस 9 ‘ शोमध्ये दमदार स्पर्धकांपैकी एक होती. त्यानंतर सनाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. शिवाय सना हिने मोठ्या पड्यावर देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सना तिच्या लव्हलाईफमुळे देखील तुफान चर्चेत आली होती. पण २०२० नंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठे बदल झाले. अभिनेत्री सना खानने चित्रपट सृष्टीला ‘अलविदा’ म्हणत, धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर सना खानने मुफ्ती अनस (Mufti Anas) याच्यासोबत लग्न केलं. मुफ्ती अनस गुजरातचा एक सुप्रसिद्ध व्यापारी आहे. जेव्हा अभिनेत्रीने हा मोठा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता अभिनेत्री पतीसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत असून लवकरच आई होणार आहे.

सना आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. सिनेविश्वात सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सनाच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगलेली असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सना कायम पतीसोबत स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.